गुहागर, ता. 29 : बाजारपेठेतील श्री देव हनुमान देवस्थान फंडाच्या अध्यक्षपदी धनंजय खातू यांची बिनविरोध झाली आहे. तसेच सेक्रेटरी पदी दीपक वेस्वीकर, खजिनदारपदी विनायक बारटक्के यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी यंदा दि. 6 एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीचे नियोजनही करण्यात आले. Khatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan Fund

तसेच यावेळी कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदी विजय सावंत, सदस्य पदी सुधीर कदम, प्रशांत दीक्षित, प्रशांत कांबळे, प्रशांत गोयथळे, निखिल तांबट, शंकर पटेल व दत्तात्रय झगडे या सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली आहे. या नूतन कमिटीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Khatu as Chairman of Guhagar Hanuman Devasthan Fund

