• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मराठा भवनासाठी सर्वाधिक योगदान राणे कुटुंब देईल

by Mayuresh Patnakar
March 29, 2023
in Guhagar
287 2
0
Rane family to contribute for Maratha Bhavan
563
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नीलेश राणे, देशभरात मराठा बँक उभारण्याचा मानस आहे

गुहागर, ता. 29 : महाराष्ट्रातील पहिले मराठा भवन गुहागर तालुक्यात उभे राहत आहे. यासाठी सर्वाधिक योगदान राणेंचे असेल. प्रत्येक जिल्ह्यात असे मराठा भवन उभे रहावे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस, माजी खासदार नीलेश राणे (MP Nilesh Rane) यांनी केले.  ते शृंगारतळी येथे क्षत्रिय मराठा युवा संघटना (Kshatriya Maratha Youth Association) गुहागर आयोजित मराठा प्रिमियर लीग २०२३ च्या बक्षिस वितरण समारंभात बोलत होते. Rane family to contribute for Maratha Bhavan

राणे म्हणाले की, मराठ्यांच्या प्रेमापोटी मी कु़डाळमधून थेट गुहागरला आलो. रत्नागिरी जिल्ह्यात अशाप्रकारची मराठा समाजाची ही एकमेव स्पर्धा होत आहे. याचा मला आनंद आहे. राज्यात आपले सरकार असून मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे आपल्याला मराठा भवन उभारणीसाठी कोणताही अडचण येणार नाही. आपण तयार केलेले प्रस्ताव त्यांच्याकडून मंजूर करुन घेऊ. अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी आर्थिक मदत लागते. ती मदत करण्यासाठी मराठा बँक उभारण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मराठा बँका व त्यांच्या शाखा व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून तेही पूर्णत्वास जाईल. असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.  Rane family to contribute for Maratha Bhavan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKshatriya Maratha Youth AssociationLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMP Nilesh RaneNews in GuhagarRane family to contribute for Maratha BhavanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share225SendTweet141
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.