सेइनुमेरो निर्माण कंपनीत ५० उमेदवारांना नोकरीचे पत्र
रत्नागिरी, ता. 28 : पुण्यातील सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. (SEINUMERO NIRMAN Pvt. Ltd. Company) कंपनीने आज नाचणे आयटीआय येथे भरती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यातून पात्र ५० उमेदवारांच्या मुलाखती घेऊन आणि कागदपत्रांची छाननी करून त्यांना थेट नोकरीचे पत्र दिले आहे. पुण्यामध्ये या कंपनीचे दोन प्लांट असून ऑटोमोबाईल क्षेत्रातील ही कंपनी आहे. रत्नागिरीत प्रथमच मुलाखत, भरती मेळावा आयोजित करून कंपनीने येथील उमेदवारांना रोजगार दिला आहे. Nachane ITI recruitment fair successful


सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी (SEINUMERO NIRMAN Pvt. Ltd. Company) गट नं. २०७, प्लॉट नं. ६, ७ व ८, शिंदेवाडी, (ता. भोर, जि. पुणे) येथे आहे. या कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर या पदासाठी भरती केली. याकरिता आयटीआय ट्रेडमधील टर्नर(Turner), फिटर(Fitter), मशिनिस्ट(Machinist), मशिनिस्ट ग्राइंडर(Machinist Grinder), मिलर(Miller), ड्रिलर (Driller), मॅकेनिकल (Mechanical), मशिन टूल्स मेंटेनन्स (Machine Tools Maintenance), डिप्लोमा मॅकेनिकल (Diploma Mechanical) आदी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. या भरती मेळाव्याला चांगला प्रतिसाद लाभला. Nachane ITI recruitment fair successful
कंपनीचे महाव्यवस्थापक (वित्त) राजीव पाध्ये यांनी सांगितले की, सेइनुमेरो निर्माण प्रा. लि. कंपनी १९९२ पासून ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल १७० कोटी असून कंपनीने पुढील वर्षापर्यंत उलाढाल २२५ कोटी रुपयांपर्यंत नेण्याची विस्तार योजना आखली आहे. त्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे. मी मूळचा धामणी (संगमेश्वर) येथील असून आपल्या रत्नागिरीतील उमेदवारांना संधी मिळण्याकरिता प्रथमच येथे भरती मेळावा आयोजित केला. Nachane ITI recruitment fair successful


भरती मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार व सिंधुरत्न योजनेचे सदस्य प्रमोद जठार व रत्नागिरी जिल्हा बेरोजगार व स्वयंरोजगार सहकारी संघाचे संचालक राजू भाटलेकर, आयटीआयचे प्राचार्य एस. जी. कोतवडेकर, महाव्यवस्थापक राजीव पाध्ये, भाजपा नेते राजीव कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील बीटीआरआय अधिकारी नीलेश मद्रे, सेइनुमेरो कंपनीचे अधिकारी श्रीशैल मैंदरगीकर, सोमनाथ गोरड, खेमचंद्र बोबडे, शेखर डिमळे, विकास काळे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी उमेदवारांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे पाहून आणि मुलाखती घेऊन निवड केली. व त्यांना पत्र देण्यात आले. दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. Nachane ITI recruitment fair successful