वीर मराठा काळसूर कौढर विजेता तर सिद्धिविनायक वरवेली उपविजेता
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर आयोजित मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धेत वीर मराठा काळसुर कौढर संघाने सिद्धिविनायक वरवेली संघावर मात करत अंतिम विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत २० संघांनी सहभाग घेतला होता. Maratha Premier League 2023 Completed
शृंगारतळीतील जानवळे फाटा येथील गोल्डन व्ह्यू मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अनेक मराठा समाजाचे दिग्गज नेते, सेलिब्रेटी उपस्थित होते. या स्पर्धेचा अंतिम सामना हा वीर मराठा काळसुर कौढर व सिद्धिविनायक वरवेली यांच्यात झाला. यामध्ये सर्व्हेश साळवी याने धुंवाधार फलंदाजी करत वीर मराठा काळसुर कौढर संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेमध्ये एकुण 20 संघ मालक आणि साडेतीनशे खेळाडू सहभागी झाले होते. Maratha Premier League 2023 Completed
विजेत्या वीर मराठा काळसुर कौढर संघाला (संघ मालक सचिन गुजर ) ५५ हजार ५५५, रुपये व ट्रॉफी, द्वितीय विजेत्या सिद्धिविनायक वरवेली (संघ मालक कुणाल देसाई, आशिष विचारे) या संघाला ३३ हजार ३३३, रुपये व ट्रॉफी, तृतीय विजेत्या जय सोनसाळवी (संघ मालक प्रकाश साळवी) जामसुत या संघाला ११ हजार, तर चतुर्थ स्वामी समर्थ (संघ मालक अमित साळवी) चिखली या संघाला ७ हजार व ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून सर्वेश साळवी तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज शिंदे, उत्कृष्ट फलंदाज सर्वेश साळवी, उत्कृष्ट गोलंदाज प्रकाश साळवी, संपूर्ण सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत मॅन ऑफ द सिरीज विराज विचारे यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. Maratha Premier League 2023 Completed
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी माजी खासदार निलेश राणे, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, सुधीर भोसले, क्षत्रिय मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अँड. संकेत साळवी, अमिष कदम, अजय खाडे, प्रकाश शिर्के, भगवान कदम, सुनील जाधव आदिंसह तालुक्यातील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. Maratha Premier League 2023 Completed