• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

by Ganesh Dhanawade
March 25, 2023
in Guhagar
101 1
0
Patpanhale High School students felicitated
198
SHARES
567
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम

गुहागर, ता.25 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसाठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग निधी संकलित करून आर्थिक मदतीचे योगदान दिल्याबद्दल गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटपन्हाळे हायस्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला. Patpanhale High School students felicitated

विद्यार्थी सत्कार समारंभासाठी मान्यवर म्हणून गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, सल्लागार व पाटपन्हाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.प्रकाश बापट, पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस. एस.चव्हाण, सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी श्री.एस.एम. आंबेकर, श्री.एस.वाय.भिडे आदी उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी मान्यवरांचा न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. Patpanhale High School students felicitated

गेली अनेक वर्ष गुहागर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी दिव्यांग निधी संकलित करून गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला आर्थिक मदतीचे योगदान देत आहेत. सदर संस्थेतर्फे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दिव्यांग निधी संकलनासाठी निधी कार्ड वितरित केल्यानंतर जे विद्यार्थी २०० रुपये पेक्षा अधिक निधी संकलित करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी यंदा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्याचे संस्थेतर्फे नियोजन करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसाठी दिव्यांग निधी संकलित करून आर्थिक मदतीचे बहुमोलाचे योगदान दिल्याबाबत विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी व अभिनंदन करण्यासाठी या संस्थेने विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न केला. Patpanhale High School students felicitated

पाटपन्हाळे हायस्कूलमधील सुमारे २५ विद्यार्थ्यांनी २०० रू. पेक्षा अधिक दिव्यांग निधी संकलित केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पाटपन्हाळे हायस्कूलमधील सुमारे ७ विद्यार्थ्यांनी ५०० रुपयेपेक्षा अधिक दिव्यांग निधी संकलित केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचा शालेयपयोगी वस्तू , सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाने दिव्यांग निधी संकलित करण्यासाठी व संस्थेला बहुमोलाचे योगदान दिल्याबाबत सदरच्या संस्थेतर्फे सन्मानपत्र , सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग, सल्लागार सुधाकर कांबळे, प्रकाश बापट यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांना प्रदान करून गौरविण्यात आले. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा निधी संकलनाचा उपक्रम व विविध राबवले जाणारे कार्यक्रम याबाबत विद्यार्थ्यांनी मनोगतातून संस्थेचे अभिनंदन केले. Patpanhale High School students felicitated

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रतिनिधी श्री.एस.वाय.भिडे यांनी केले. सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ.एस. एस.चव्हाण यांनी गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे पदाधिकारी पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक, आर्थिक निधी संकलित केलेले बहुसंख्य विद्यार्थी व कार्यक्रमासाठी विद्यालयातील उपस्थित असणारे बहुसंख्य विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Patpanhale High School students felicitated

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPatpanhale High School students felicitatedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.