श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांचे कीर्तन
गुहागर, ता. 25: तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील श्री हनुमान मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर फड, श्रीक्षेत्र पंढरपुर श्रीसंत जगदगुरू तुकाराम महाराज बिजोत्सव व संतश्रेष्ठ एकनाथ महाराज षष्ठी व पोथी वर्धापन दिन सुवर्ण महोत्सवानिमित्त हा सप्ताह घेण्यात आला होता. हा कार्यक्रम ह. भ. प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली (आजरेकर फडप्रमुख – श्रीक्षेत्र पंढरपुर) यांच्या अधीपत्याखाली संपन्न झाला. Akhand Harinam week at Peve Kharekond

या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन, हरिपाठ, नित्य आरती, हरिकिर्तन, जागर पार पडले. त्याचप्रमाणे वै. गुरुवर्य ह. भ. प. रामचंद्र भाऊ डोंगळे यांचा पुतळा अनावरण श्रीगुरुच्या हस्ते करण्यात आले. या हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प. मोहन संसारे (शृंगारतळी), ह.भ.प. सुधाकर निवळकर (कात्रोली), ह.भ.प. वासुदेव साळवी (खरेकोंड), पं. पू.श्रीगुरू विठ्ठल महाराज वासकट माऊली (फडप्रमुख पंढरपुर), ह.भ.प.सचिन साळवी (खरेकोंड), ह.भ.प. दिपक साळवी (खरेकोंड), प.पू. श्रीगुरू ह.भ.प. हरिदास रामभाऊ बोराटे आदींचे प्रवचन तसेच ह.भ.प. गोविंदबुवा साळवी (खरेकोंड), ह.भ.प. कुणाल पाष्टे (चिपळूण), ह.भ.प. नारायण पवार अनारी (चिपळूण), ह.भ.प.संतोष सावरटकर (खरेकोंड), प.पू. श्रीगुरु ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर माऊली, ह.भ.प. सचिन साळवी, (खरेकोंड), ह.भ.प.विकास महाराज (बाचिम), ह.भ.प. रुपेश शिर्के, श्रीगुरु ह. भ.प. हरिदास रामभाऊ बोराटे आदींनी किर्तन सेवा केली. तर शेवटच्या दिवशी श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली श्रीक्षेत्र पंढरपुर यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. Akhand Harinam week at Peve Kharekond

प. पु. वै. ह. भ. प. रामचंद्र भाऊ डोंगळे महाराज यांनी गुहागर तालुक्यातील पेवे खरेकोंड गावाला वारकरी सांप्रदायिक गाव म्हणून ओळख मिळवून दिली. पेवे खरेकोंड गावाला वै. ह.भ.प. रामचंद्र भाऊ डोंगळे महाराज मूळ गाव नेरळे, ता. पाटण हे आपली सांप्रदायिक कर्मभुमी मानत होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खरेकोंड ग्रामस्थांच्या वतीने समाधी मंदिर बांधण्यात आली आहे. या समाधी मंदिरात प.पु. वै. ह.भ.प. रामचंद्र भाऊ डोंगळे महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली (आजरेकर फडप्रमुख – श्रीक्षेत्र पंढरपुर) यांच्या हस्ते करण्यात आले. Akhand Harinam week at Peve Kharekond

या हरिनाम सप्ताहासाठी समस्त मुंबई मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ, वारकरी सांप्रदाय पेवे खरेकोंड यांनी मेहनत घेतली. Akhand Harinam week at Peve Kharekond
