• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी भरिव तरतूद

by Mayuresh Patnakar
March 25, 2023
in Bharat
84 0
0
Substantial provision for fishermen in Budget
164
SHARES
469
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

(प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)
           रत्नागिरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे फळशेती व भातशेती होते. त्याचप्रमाणे येथे मत्स्यशेती अर्थात मासेमारी देखील उपजिविकेचा एक महत्वाचा भाग आहे. आणि हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुद महत्वाच्या ठरतात. कारण जिल्ह्याला लाभलेला सागर किनारा मोठा आहे. Substantial provision for fishermen in Budget

            जिल्हयात 167 किमी लांबीचा सागर किनारा लाभला असून त्यावर उपजिविका असणाऱ्या कुटुंबाची संख्या देखील मोठी आहे. जिल्हयात सर्वात अधिक लांबीचा सागर किनारा रत्नागिरी तालुक्यात आहे (56 किलोमीटर) त्याखालोखाल गुहागर 38 किमी, दापोली 35 किमी, मंडणगड 20 किमी आणि राजापूर 18 किमी सागर किनारा आहे. Substantial provision for fishermen in Budget

            जिल्हयात सन २०२१-२२ च्या सागरी हंगामात 1 लाख 1 हजार  288 मेट्रीक टन उत्पादन झाले आहे. समुद्रात मत्सव्यवसाय सहकारी सस्थांची संख्या 41 हजार 40 असून एकूण मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्या 2936 आहे. त्यात 2252 बोट या यांत्रिक बोटी असून सर्वांना मासेमारी साठी समुद्रात जाताना डिझेलची आवश्यकता असते. Substantial provision for fishermen in Budget

            जिल्हयात मासे उतरविणाच्या केंद्राची एकूण संख्या 46 इतकी आहे. यात तालुकानिहाय संख्‍या रत्नागिरी 20, गुहागर 12, दापोली 9, मंडणगड 1 आणि राजापूर 4 अशी केंद्र आहेत. Substantial provision for fishermen in Budget

            यंदा जाहीर अर्थसंकल्पात या मासेमारीवर अवलंबून  असलेल्या गावांसाठी मच्छीमार विकास निधी अंतर्गत 50 कोटींचा मच्छीमार विकास निधी जाहीर करण्यात आला आहे. त्याचा जिल्हयातील मासेमारी व्यवसाय विकासासह किनारपट्टीवर वसलेल्या गावांचाही विकास होणार आहे. Substantial provision for fishermen in Budget

            अर्थसंकल्पात भरिव तरतूद करण्यासोबतच मासेमारी साठीचा डिझेल परतावा आणि प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या  क्षेत्रात मत्समारांना त्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठीची घोषणा देखील पाठोपाठ झाली आहे. Substantial provision for fishermen in Budget            

सागरी खाद्य अर्थात सी-फूडची विशिष्ट संस्कृती या जिल्ह्यात आहे आणि ती जपणे व समृध्द करणे यासाठी शासनाच्या अर्थसंकल्पातील योजना सहाय्यक ठरणार आहे. Substantial provision for fishermen in Budget

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSubstantial provision for fishermen in BudgetUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.