• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भावार्थमध्ये रंगला जेष्ठ साहित्यिक कविवर्य ज्ञानेश्वर झगडे

by Ganesh Dhanawade
March 24, 2023
in Guhagar
80 1
0
Word Travel - Dnyaneshwar Zagade
158
SHARES
450
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : टीडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये गुहागरातील जेष्ठ साहित्यिक कविवर्य, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व ज्ञानरश्मी वाचनालयाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर झगडे यांच्या समवेत ‘शब्दप्रवास – प्रवास शब्दांचा, आपल्या माणसांचा’ हा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. Word Travel – Dnyaneshwar Zagade

शब्दप्रवास हा असा एक उपक्रम आहे, ज्यामध्ये अनेक नवोदित आणि स्थानिक लेखक-कवींना व्यासपीठ मिळावे, त्यांचे लिखाण लेखन कौशल्य लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचावे यासाठी भावार्थतर्फे शब्दप्रवास या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शब्दप्रवास कार्यक्रमात ज्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे, त्या स्थानिक लेखकांची मुलाखत आयोजित केली जाते. त्यातून त्यांचा लेखनप्रवास, जीवनप्रवास उलगडला जातो. मराठी साहित्य संस्कृतीचा वारसा जपणारे मराठी साहित्य भांडार म्हणजे भावार्थ होय. Word Travel – Dnyaneshwar Zagade

पुस्तक दालनाच्या रूपात टीडब्ल्यूजे फाउंडेशन – द सोशल रिफॉर्म्स अंतर्गत चिपळूण पाग या ठिकाणी भावार्थ पुस्तक आणि बरंच काही असे दालन सुरू झालेले आहे. भावार्थ अंतर्गत साहित्य वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार होण्यासाठी वेगवेगळे उपक्रम नियमितपणे राबविले जातात. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे शब्दप्रवास ‌होय. Word Travel – Dnyaneshwar Zagade

गुहागर तालुक्यातील असगोली गावचे सुपुत्र, जेष्ठ साहित्यिक कविवर्य श्री. ज्ञानेश्वर झगडे शालेय जीवनात मराठी शिक्षकांच्या प्रेरणेने त्यांनी कविता लेखनास सुरूवात केली. तरी पुढे उत्तम कवी व साहित्यिक या पदापर्यंत पोहोचली. कविता, नाटक, कथा, एकांकिका अशा विविध साहित्य प्रांतातील लेखनाचा श्री. झगडे त्यांचा प्रवास” शब्दप्रवास” या उपक्रमातून उलगडण्यात आला.”छप्पर सोन्याचे” या त्यांच्या कविता संग्रहाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हा कविता संग्रह जणू कवीने जगलेले जीवन चरित्रच वाचकांसमोर मांडत असल्याचा भास वाचकांना होताना दिसतो. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांवर कवी ज्ञानेश्वर झगडे यांनी आपल्या गाजलेल्या काही कवितांचे सादरीकरण केले. ज्या सादरीकरणात त्यांच्या बोली भाषेची निखळ छाप साहित्य रसिकांना पहायला मिळाली. उपक्रमाला उपस्थित असलेल्या साहित्य प्रेमींनी ज्ञानेश्वर झगडे यांचे व भावार्थच्या उपक्रमांचे खूप कौतुक करत शुभेच्छा दिल्या. तसेच तेथे उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक यांनी श्री. झगडे यांनी लोककला संस्कृतीवर लेखन करण्यास सुचवले “छप्पर सोन्याचे काव्य मैफील” हा त्यांचा नव्यानेच सुरू झालेला कार्यक्रम सर्व श्रोत्यांना खूप आवडतो आहे. त्याच्या प्रचार व प्रसार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. Word Travel – Dnyaneshwar Zagade

शब्दप्रवासी जेष्ठ साहित्यिक कविवर्य ज्ञानेश्वर झगडे यांच्या शब्दप्रवास या कार्यक्रमाला चिपळूण येथील जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपाल सावंत, महंमद झारे, मंगेश बापट, गुहागर मसापचे उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, सुभाष गमरे, भिमलेश वारके सामाजिक कार्यकर्ते प्रभुनाथ देवळेकर यांसह साहित्यप्रेमी रसिकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावार्थचे व्यवस्थापक श्री. विवेक कदम व भावार्थच्या प्रेरणा करंदीकर, मधुरा परांजपे, कार्यवाह रविदास कांबळे जनसंपर्क समन्वयक प्रथमेश पोमेंडकर व द सोशल रिफॉर्म्सच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतली. Word Travel – Dnyaneshwar Zagade

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWord Travel - Dnyaneshwar Zagadeगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.