पशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा
रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023 (Mahapashudhan Expo 2023) चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पो मध्ये देशातील विविध प्रकार व जातीची तसेच अतिशय दुर्मिळ प्रकारची जनावरे पाहण्याची संधी पशुप्रेमींना व पशुपालकांना उपलब्ध होणार आहे. Mahapasudhan Expo-2023
याबरोबरच आधुनिक दुग्ध तंत्रज्ञान, चारा पिके व पद्धती फायदेशीर शेळीपालन, कुक्कुट पालन (मांसल/परसातील/अंडी घालणारी) व पशुसंवर्धनाशी निगडीत व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य व रोजगार निर्मितीच्या संधी आणि लिंग विनिश्चित रेतमात्रा (ET/IVF), भविष्यातील आव्हाने, अशा विविध विषयांवरील मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. Mahapasudhan Expo-2023

प्रदर्शन ४६ एकर एवढ्या विस्तीर्ण जागेवर होणार असून, यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमधील उत्कृष्ट पशुधन, पशुपक्षी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पद्धतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे. Mahapasudhan Expo-2023
जवळपास ६५ प्रकारचे विविध पशुपक्षी जाती विविध स्टॉल्स, संयंत्रे, मुरघास, अझोला, लिंग निर्धारित रेतमात्रा, दूध, मांस, अंडी, लोकर, उत्पादन तंत्रज्ञान माहिती, बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी, विविध शासकीय योजना, वैरण उत्पादन, प्रात्यक्षिके आदींची माहिती प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. Mahapasudhan Expo-2023

तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या महापशुधन एक्स्पो- 2023 ला भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे. Mahapasudhan Expo-2023
