गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुका पतसंस्था फोरम व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्था प्रतिनिधी यांच्यासाठी अद्ययावत सहकारी कायदा, नियम व परिपत्रके या बाबत प्रबोधन करण्यासाठी चिपळूण येथील ब्राम्हण सहाय्यक संघ येथे घेण्यात आली. Workshop for Co-operative Credit Institutions
प्रथम जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. दिपक पटवर्धन, सहाय्यक निबंधक श्री. रोहिदास बांगर, श्री. समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे श्री. प्रभाकर आरेकर, श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे श्री. बालाजी चिले आणि कोकण कन्या नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती सुमती जांभेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे नियामक मंडळाची माहिती देण्याकरिता जिल्हाभर कार्यशाळा आयोजित करून जे विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांचा कृतज्ञतापूर्वक श्री. बालाजी चिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे चेअरमन, जिल्हा बँक संचालक, रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि नुकतीच महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष पदी निवड झालेले श्री. दिपक पटवर्धन यांचा श्री. बांगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर श्री बांगर यांना चिपळूण तालुका वैश्य नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. शेट्ये यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. Workshop for Co-operative Credit Institutions
सन १९८८ साली तालुक्यातील प्रथम नोंदणी नागरी सहकारी पतसंस्था, किसान नागरी पतसंस्था चेअरमन श्री. चंद्रकांत मांडवकर साहेब यांना उपनिबंधक डॉ. शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तालुक्यातील प्रथम कर्मचारी पतसंस्था म्हणून सह्याद्री शिक्षण सेवक पतसंस्थेला श्री. दिपक पटवर्धन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गृहनिर्माण संस्था प्रातिनिधिक स्वरूपात यशोधरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे श्री. गणेश काटकर यांना सहाय्यक निबंधक कार्यालयातील लिपिक श्री. देवरुखकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील प्रथम महिला नागरी पतसंस्था म्हणून कोकणकन्या नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती सुमती जांभेकर यांना सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सौ. प्रियांका माने यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तालुक्यातील विभागस्तरीय पतसंस्था म्हणून श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे श्री. प्रभाकर आरेकर यांना संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ञ संचालक श्री. प्रकाशशेठ साळवी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. तर तालुक्यातील जिल्हास्तरीय पतसंस्था म्हणून श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. चिले यांचा शुभंकरोती पतसंस्थेचे चेअरमन श्री. पोतदार यांनी सत्कार केला. Workshop for Co-operative Credit Institutions

यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी पतसंस्था आणि गृहनिर्माण संस्थांच्या विविध प्रकरणे आणि पतसंस्था नियामक मंडळाची विस्तृत माहिती दिली. उपस्थित संस्था प्रतिनिधींच्या विविध प्रश्नांवर मुद्देसूद, अभ्यासू आणि समर्पक उत्तरे दिली. श्री दिपक पटवर्धन यांनी पतसंस्था व्यवसाय विकास आराखडा, पतसंस्था समोरील आव्हाने व उपाय, नॉमिनेशन, सोनेतारण कर्ज आणि भागभांडवल आदी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. श्री बांगर यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी तंटामुक्त अभियानावर विवेचन केले. Workshop for Co-operative Credit Institutions
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कोकणकन्या नागरी पतसंस्थेच्या चेअरमन श्रीमती सुमती जांभेकर यांनी केले. सूत्रसंचालन संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्री. सुनिल टेरवकर यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सौ. प्रियांका माने यांनी केले. Workshop for Co-operative Credit Institutions

