उमराठ ग्रामपंचायतीचा उपक्रम, कोंडवीवाडीच्या साह्याने 20 पथदिप बसवले
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत आणि उत्कर्ष मंडळ, कोंडवी वाडी यांच्या संयुक्त संकल्पनेतून 20 स्वयंचलित सौरपथदिप पथ बसविण्यात आले आहेत. यासाठी 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला. पालशेतच्या कृपासिंधू सोलार सिस्टीमचे मालक समीर काळे यांनी ही योजना प्रत्यक्षात उतरवली. Automatic solar lights installed at Umrath

उमराठ गाव डोंगराळ भागात वसलेला आहे . येथे सर्वच वाड्यांवर दिवाबत्तीची पुरेशी सोय नव्हती. कोंडवीवाडीने पथदिपांची मागणी केली होती. याबाबत सौर पथदिपांचा आग्रह ग्रामस्थांनी केला. त्यांच्या या मागणीचा सकारात्मक विचार सरपंच जनार्दन आंबेकर आणि ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे करत होते. याच कालावधीत कृपासिंधु सोलार सिस्टीमचे समीर काळे यांची भेट झाली. त्यांनी सौर उर्जेवरील पथदिपांची माहिती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांना दिली. त्यांनीच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास मदत केली. Automatic solar lights installed at Umrath

या प्रकल्पात ४ सौर पॅनल, २२० Ah च्या दोन बॅटरी, सोलर चार्ज कंट्रोलर, आणि २० पथदिवे लावण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्री दिवे सुरु होणे व दिवसा बंद होणेसाठी स्वयंचलीत व्यवस्था, व्होल्टेज नियंत्रक, वीजरोधक यंत्रणा, शॉर्ट सर्किट प्रतिबंधक यंत्रणा ही जोडण्यात आल्या आहे. ही संपूर्ण यंत्रणा 200 ah चालते. परंतु पावसाळा, ढगाळ वातावरणात कमी सौर वीज तयार झाली तरी 20 पथदिप प्रकाशत रहावेत यासाठी दोन बॅटऱ्या जोडण्यात आल्या आहेत. साधारणपणे संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच ११ तास हे पथदिप चालू असतात. Automatic solar lights installed at Umrath

या स्वयंचलित सौर ऊर्जा पथ दिवाबत्ती योजनेचे उद्घाटन रविवारी (12 मार्चला) सायंकाळी ७.०० वाजता कोंडवी वाडी येथे ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुरज घाडे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव कदम, संदीप गोरिवले, पोलीस पाटील वासंती आंबेकर ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, अरविंद गवई, कृषी सेवक सतिश सपकाळ, गावातील सर्व वाडी प्रमुख, गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मंडळी तसेच यजमान कोंडवीवाडीतील अध्यक्ष भिकू मालप तसेच वाडीतील स्थानिक आणि मुंबईकर स्त्री-पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Automatic solar lights installed at Umrath

सौर ऊर्जेचा वापर करून वाडीत पथ दिवाबत्तीची सोय करणारी गुहागर तालुक्यातील उमराठ गावातील “कोंडवी वाडी” हि पहिली वाडी ठरली आहे. जरी महावितरण कंपनीचा वीजपुरवठा खंडीत झाला तरी संपूर्ण वाडी व सभागृह प्रकाशमय असते. – जनार्दन आंबेकर, सरपंच, उमराठ ग्रामपंचायत Automatic solar lights installed at Umrath
