• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर येथे महिला दिन उत्साहात संपन्न

by Mayuresh Patnakar
March 17, 2023
in Guhagar
84 1
0
Women's Day celebrated at Valneshwar

महिला दिनानिमित्त आदर्श सासू म्हणून सौ गुलाब ठाकूर यांचा सन्मान करताना तहसीलदार प्रतिभा वराळे मॅडम

165
SHARES
472
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामसंघ वेळणेश्वर आयोजित कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे महिला दिनानिमित्त ग्रामसंघ वेळणेश्वर तर्फे कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. Women’s Day celebrated at Varaneshwar

महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामसंघ वेळणेश्वर कलासाधना हा महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जि प शाळा वेळणेश्वरच्या भव्य पटांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये आदर्श सासू म्हणून वेळणेश्वर गावच्या सौ गुलाब सूर्यकांत ठाकूर यांचा तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Women’s Day celebrated at Valneshwar

यावेळी बोलताना गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे म्हणाल्या की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेतली आहे, सुशिक्षित महिला शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जात आहेत, पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते आणि यशस्वी स्त्रीच्या मागे अख्खे कुटुंब असते, अशा कुटुंबव्यवस्था आपण सोबत घेऊन जाण्याची गरज आहे. एकत्रित कुंटूब पद्धती बांधुन ठेवणे गरजेचे आहे. आपले संस्कार, पंरपरा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत व्यवस्थितपणे नेणे महत्वाचे आहे. महिलांनी आपला सामाजिक व आर्थिक विकास करणे आज गरजेचे आहे. महिलांनी स्वत:शीच स्पर्धा करावयाची आहे, त्यातून आपल्या कुंटुबांचे प्रगती केली पाहीजे. आपले कर्तव्य लक्षात ठेवून आपण काम केले पाहिजे, तळागाळापर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. Women’s Day celebrated at Valneshwar

यावेळी माजी जि. प सदस्य नेत्रा ठाकूर, सरपंच चैतन्य धोपावकर, उपसरपंच अमोल जामसुतकर, ग्रा. सदस्य सुप्रिया आरवलकर, सौ कटनाक, सौ केळकर,  तंटामुक्ती अध्यक्ष समीर पावसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गावणंग, डॉ.गुंजवटे, जि प शाळा मुख्याध्यापक  मोते, शालेय  व्यवस्थापन समिती सदस्य विश्वजीत जामसुतकर, पत्रकार उमेश शिंदे, बचत गटांच्या सर्व अध्यक्ष सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. Women’s Day celebrated at Valneshwar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWomen's Day celebrated at Valneshwarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet41
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.