• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुख्यमंत्र्याच्या साधेपणाचे दर्शन घडले

by Mayuresh Patnakar
March 16, 2023
in Politics
251 3
0
Simplicity of the Chief Minister
493
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नीलेश सुर्वे, मंत्री उदय सामंत यांनी प्रभावित केले.

गुहागर, ता. 16 : सभागृह सुरु असतानाही 10 मिनिटांचा वेळ काढून मुख्यमंत्री आम्हाला भेटायला आले. चार मित्रांनी सहज गप्पा माराव्यात, अशी चर्चा केली. यात कुठेही आपण मुख्यमंत्री असल्याचा भाव नव्हता. आमच्या मनातील भाव ओळखून मंत्री उदय सामंत यांनी मित्रत्वाच्या नात्याने मुख्यमंत्र्यांसोबत आमचा फोटोही काढला. असा अनुभव गुहागरचे भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी दै. सकाळला सांगितला. Simplicity of the Chief Minister

Simplicity of the Chief Minister

नीलेश सुर्वे म्हणाले की, मंगळवारी 14 मार्चला गुहागरच्या शहर विकास आराखड्याचा मुद्दा घेवून आम्ही मुंबईत गेलो होतो. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: संपर्क करुन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची वेळ निश्चित केली होती. वास्ताविक सोमवारी 13 मार्चला गुहागरवासीयांनी उदय सामंत यांची भेट घेतली होती. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमचेही जिल्हा उपाध्यक्ष भेटले होते. अधिवेशन सुरु असल्याने सामंत आमची भेट टाळु शकले असते. परंतु बावनकुळे यांच्या विनंतीला मान देवून ठरलेल्या वेळेवर एक्सप्रेस टॉवरमध्ये पालकमंत्री आले. भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी बोलले. गुहागरच्या विकास आराखड्यातील त्रुटी समजून घेतल्या. विकास आराखड्यात टाकलेल्या महामार्गाच्या नकाशाविषयी पालकमंत्र्यांनी थेट गुहागरच्या सीईओना फोन करुन शब्दश: झापले. तसेच केवळ पत्र नको आपण थेट मुख्यमंत्र्यांना भेटू असे सांगत आमच्यासमोर मुख्यमंत्र्याच्या पीएला फोन केला. विधानसभेत जाण्यासाठी दोन पास बनवून घेण्याची व्यवस्था केली. मी व किरण खरे यांना स्वत:च्या वाहनातून विधानसभेत नेले. तिथे मुख्यमंत्र्याच्या कक्षात आम्हाला बसवून मंत्री उदय सामंत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावण्यासाठी सभागृहात गेले. अवघ्या पाच मिनीटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दालनात आले आणि थेट ओळख करुन गप्पा मारण्यास सुरवात केली. ते त्यांच्या दालनात टेबलाला टेकून उभे होते. उभ्या उभ्याच विकास आराखड्याचा विषय समजून घेतला. तिथुनच थेट राज्याच्या मुख्य सचिवांना संपर्क करुन विकास आराखड्याला स्थगिती देण्याची सूचना केली. Simplicity of the Chief Minister

दालनात आम्ही चौघेच होतो. मुख्यमंत्र्यासोबत एकतरी फोटो हवा असे आमच्या मनात येत होते. आमच्या चेहऱ्यावरुन हे भाव उदय सामंत यांनी ओळखले आणि किरण खरे यांच्या खरेकाका तुमचा मोबाईल द्या मी फोटो काढतो असे सांगितले. आम्हीच बुचकळ्यात पडलो होतो. एका मंत्र्याला आपला फोटो काढायला सांगणे मनाला पटत नव्हते. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फोटोसाठी उभे केले आणि पालकमंत्र्यांनी आमची भेट कॅमेरात बंद केली. Simplicity of the Chief Minister

कोणत्याही प्रकारचा अभिनिवेशन न बाळगता, प्रेमळ मित्रासारखा गप्पा मारणारे मुख्यमंत्री आम्ही एकनाथ शिंदेंच्या रुपाने अनुभवले. त्याचबरोबर स्वत:च्या गाडीतून घेवून जाणारे, आमचे पास स्वत: बनविणारे आणि आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांना सभागृहातून घेवून येणारे पालकमंत्री उदय सामंत आम्ही याची देही याची डोळा अनुभवले. आपले मुख्यमंत्री, पालकमंत्री असे असु शकतात याचा विचारही आम्ही केला नव्हता. आजपर्यंतच्या छोट्याशा राजकीय जीवनातील ही भेट नक्कीच आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.  Simplicity of the Chief Minister

Tags: chief MinisterGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUday SamanthaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share197SendTweet123
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.