• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयाला दिली पुस्तकांची भेट

by Ganesh Dhanawade
March 16, 2023
in Guhagar
63 0
0
Gift of books to Patpanhale College

पाटपन्हाळे हायस्कूलसाठी पुस्तकरुपी भेट देताना रमेश चव्हाण व परिवार.

123
SHARES
352
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी आईच्या स्मरणार्थ दिला १६० पुस्तकांचा संच

गुहागर, ता. 16 : कै. सौ. जनाबाई तुकाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ पुणे येथील श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे यांना सुमारे १६० पुस्तकांचा संच देणगी रूपाने भेट दिली. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, संचालक अनंत चव्हाण व मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्याकडे पुस्तक वितरण कार्यक्रमानिमित्त पुस्तक संच सुपूर्द केला. Gift of books to Patpanhale College

पुणे येथील श्री.रमेश तुकाराम चव्हाण यांच्या मातोश्री कै.सौ.जनाबाई तुकाराम चव्हाण यांना वाचनाची आवड, उत्तम पाठांतर ही कौशल्ये वयाच्या ७५ व्या वर्षापर्यंत जोपासलेली होती. शैक्षणिक कार्याने आईची स्मृती राहावी, या हेतूने श्री. चव्हाण यांनी मनोरंजनात्मक, बोधात्मक, विविध मराठी साहित्यिक व कवी, वैज्ञानिक, पर्यावरणविषयक अशा विविध विषयांनुसार सुमारे १६० पुस्तकांचा संच देणगीरुपी भेटवस्तू न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पुस्तक वितरण समारंभात दिली. Gift of books to Patpanhale College

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करता येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य वाढण्याच्या हेतूने असा उपक्रम पाटपन्हाळे हायस्कूलच्या सहकार्याने राबविण्यात आल्याचे सांगितले. तसेच आगामी काळात विद्यार्थ्यांना विविध विषयांबाबतची पुस्तके वितरीत करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण यांनी रमेश चव्हाण यांनी पुस्तकरुपी देणगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. विविध पुस्तके वाचून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करता येईल. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची सवय लागून अभ्यासवृत्ती वाढेल, असे ते म्हणाले. मुख्याध्यापक श्री. एम.ए. थरकार यांनी रमेश चव्हाण व परिवाराने पाटपन्हाळे हायस्कूलसाठी पुस्तकरुपी भेट दिल्याबद्दल धन्यवाद दिले. पुस्तकरूपी भेटवस्तूतून शाळा व विद्यार्थी यांना फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून वाचन कौशल्य आत्मसात करायला हवे. ज्ञान संपादनासाठी पुस्तकांचे मोल खूप मोठे आहे. विद्यार्थ्यांनी वाचन प्रवृत्ती अंगीकारली पाहिजे असे त्यांनी सांगितले. Gift of books to Patpanhale College

यावेळी देणगीदार रमेश तुकाराम चव्हाण, पत्नी सौ.गीता चव्हाण, मुलगी योगिता चव्हाण, शिरळ ग्रामपंचायत सदस्या संगीता मोरे, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधाकर चव्हाण, संचालक अनंत चव्हाण, मुख्याध्यापक एम.ए. थरकार, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी श्री. एस.एम.आंबेकर, सौ. एन.पी. वैद्य आदी उपस्थित होते. सहाय्यक शिक्षिका सौ.एन.पी.वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. Gift of books to Patpanhale College

Tags: Gift of books to Patpanhale CollegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share49SendTweet31
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.