श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ,अडूर आयोजित
गुहागर, ता.15 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाच्या क्रीडा विभागातर्गत शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाघजाई कोळकेवाडी संघाने न्यू हिंद विजय, चिपळूण संघावर मात करून विजेतेपद मिळविले. District Level Kabaddi Tournament in Adur
तालुक्यातील कबड्डीची पंढरी म्हणून ओळख ठेवणाऱ्या अडूर मधील या मंडळाच्या स्पर्धेचे यंदाचे हे ३४ वे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय व प्रो कबड्डी या व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मातब्बदार खेळाडू व पंच पॅनलचा समावेश होता. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांनी विक्रमी गर्दी केली होती. यावेळी अडूर ग्रामदेवता सुंकाई मातेचा कोकणात प्रसिद्ध असलेला पेटत्या होमातून धावणारा संकासुराचा खेळ आयोजकांकडून प्रेक्षकांना दाखविण्यात आला. District Level Kabaddi Tournament in Adur

या कबड्डी स्पर्धेत विजेत्या वाघजाई कोळकेवाडी संघाला ओ.बी.सी.मोर्चा उत्तर रत्नागिरीचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या हस्ते रोख रक्कम ३३ हजार ३३३ रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक न्यू हिंद विजय चिपळूण संघाला रोख रक्कम २२ हजार २२२ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकावर स्थानिक संघ तृप्ती नगर, अडूर या संघाला रोख रक्कम ११ हजार १११ रुपये सन्मानचिन्ह चतुर्थ क्रमांक दापोली येथील अमर भारत टाळसुरे संघाला प्राप्त होऊन त्यांना रोख रक्कम ७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईपटू म्हणून प्रो कबड्डी मधील स्टार खेळाडू वाघजाई कोळकेवाडी संघाचा कर्णधार अजिंक्य पवार, उत्कृष्ट पकडपटू म्हणून न्यू हिंद विजय चिपळूण संघाचा भूषण गुढेकर यांची निवड करण्यात आली. तसेच स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून वाघजाई कोळकेवाडी संघातील होतकरू खेळाडू साईराज कुंभार यांस देवून सन्मानित करण्यात आले. District Level Kabaddi Tournament in Adur
