• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगररचनाकारांनी केली गुहागरवासीयांची दिशाभुल

by Mayuresh Patnakar
March 14, 2023
in Guhagar
169 2
1
Town planner showed Unsanctioned highway in DP

गुहागर : शहर विकास आराखड्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेताना गुहागर तालुक्यातील पदाधिकारी

333
SHARES
950
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

किरण खरे, मंजूरी नसलेला महामार्ग आराखड्यात कसा दाखवला

गुहागर, ता. 14 : रस्ते विकास महामंडळाची परवानगी न घेता, आरेखन मंजूर नसलेला महामार्ग विकास आराखड्यात दाखविण्यात आला आहे. शहराचा विकास आराखडा बनविणाऱ्या नगररचनाकारांनी गुहागरवासीयांची दिशाभुल केली आहे. असा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांनी केला. मंगळवारी (14 मार्च) शहर विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी, मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या भेटी घेण्यासाठी गुहागरमधील भाजपचे पदाधिकारी मुंबईत गेले होते. त्यावेळी दूरध्वनीवरुन किरण खरे यांनी ही माहिती दिली.Town planner showed Unsanctioned highway in DP

गुहागर शहर विकास आराखड्यात 30 मिटर रुंदीचा महामार्ग दाखविण्यात आला आहे. या महामार्गामुळे वरचापाट तर्फे गुहागर या महसुली गावाचे विभाजन होत आहे. दोन घरांसह अनेकांची शेती धोक्यात येत आहे. त्यामुळे दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष व भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे यांनी नगरपंचायत, सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी महामार्गाचे ३ आरेखन नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापैकी एक नकाशा विकास आराखड्यात टाकण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अशी माहिती नगररचनाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. Town planner showed Unsanctioned highway in DP

या माहितीने समाधान न झाल्याने किरण खरे यांनी थेट मुंबईतील महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी किरण खरे यांना सांगितले की, रस्ते विकास महामंडळाने अजुनपर्यंत महामार्गाचे कोणतेच आरेखन निश्चित केलेले नाही. गुहागरच्या विकास आराखड्यात कोणता महामार्ग दाखवावा या संदर्भात नगर रचनाकार कार्यालय रत्नागिरीबरोबर कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. ही माहिती मिळताच किरण खरे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयातून गुहागर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांना फोन केला. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती शिंगटेंना देत शहर विकास आराखड्यात महामार्ग कसा दाखविण्यात आला अशी विचारणा केली. त्यावर शिंगटे यांनी माहिती घ्यावी लागेल. तुम्ही गुहागरला आल्यावर आपण चर्चा करु. असे सांगितले. Town planner showed Unsanctioned highway in DP

या विषयाबाबत दूरध्वनीद्वारे बोलताना किरण खरे म्हणाले की, गुहागरचा विकास आराखडा बनविणाऱ्यांनी जाणिवपूर्वक, गुहागरकरांची दिशाभुल करण्यासाठी महामार्गाचे आरक्षण टाकले आहे.  अधिकाऱ्यांनी जनतेची केलेली फसवणुक आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे हे उघड झाले. आता रत्नागिरी नगररचनाकार विभागाने असे का केले याचा खुलासा करावा. अन्यथा योग्य ठिकाणी आम्हाला तक्रार करावी लागेल. Town planner showed Unsanctioned highway in DP

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTown planner showed Unsanctioned highway in DPUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share133SendTweet83
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.