गुहागर, ता.14 : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते, खारवी सामाजाचे व मच्छिमारांचे नेते आणि वेलदूर गावचे सामाजिक नेतृत्व असलेले श्री. अंबाजीशेठ दाभोळकर यांचे आज मंगळवार दि. 14 रोजी मुंबई कळवा येथील त्यांच्या निवास्थानी सकाळी 10 वाजता हृदयविकाराने आकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच वेलदूर तसेच मच्छीमार समाजावर शोककला पसरली आहे. Fisherman leader Dabholkar No More

अंबाजी दाभोलकर हे गेली अनेक वर्षे मच्छीमार समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते. वेलदूर मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन व सल्लागार म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी, मच्छीमार संघावर प्रशासक म्हणूनही काम पाहिले आहे. वेलदूर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, खारवीवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, खारवी समाज संघटनेचे अध्यक्ष व सल्लागार, आपल्या समाजाबरोबरच तालुक्यात सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग मोठा होता. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. गावातील खंबीर नेतृत्व हरपल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. Fisherman leader Dabholkar No More
त्यांचा अंत्यविधी उद्या बुधवार दि. 15 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरी वेलदूर येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, मुली, नातवंड असा परिवार आहे. Fisherman leader Dabholkar No More
