• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथे तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा

by Ganesh Dhanawade
March 14, 2023
in Guhagar
109 1
0
Temple restoration ceremony at Talvali
214
SHARES
611
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.14 : तालुक्यातील तळवली चिंचवाडी येथे उद्या बुधवार दि. 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा. तर 16 रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.  Temple restoration ceremony at Talvali

तुकाराम महाराज मंदिर जीर्णोद्धार निमित्त दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात 15 रोजी श्री संत तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना ह. भ. प. गोविंद साळवी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. तर 16 रोजी हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 15 रोजी सकाळी 8 वा. तुकाराम महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, सकाळी 9 वा. सचिन साळवी यांचे कीर्तन, संध्याकाळी 7 वाजता तळवली वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ, रात्री 10 वाजता श्रीधर आग्रे यांचे भजन, रात्री 11 वाजता श्री सुकाईदेवी तळवली यांचा बहुरंगी तमाशा, गुरुवार दि.16 रोजी सकाळी 8 वाजता श्री तुकाराम महाराज मूर्ती अभिषेक, सकाळी 11 वाजता महाआरती, संध्या 4 वा. महिलांचे हळदीकुंकू, संध्या 7 वाजता गुरू आजरेकर माऊली पंढरपूर यांचे कीर्तन, रात्री 9 वा. महाप्रसाद,रात्री 10 वाजता सुरेश सांगळे यांचे भजन, रात्री 11 वाजता सुरेश शिगवण व संजय ताम्हणकर यांचे भजन पार पडणार आहे. Temple restoration ceremony at Talvali

तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ व महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे. Temple restoration ceremony at Talvali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTemple restoration ceremony at TalvaliUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.