• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वीजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
March 14, 2023
in Guhagar
172 2
0
Death of an adult due to electric shock
339
SHARES
968
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आबलोलीतील घटना, विजापूरातील कामगार

गुहागर, ता. 14 : हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा जागीत मृत्यू झाला आहे. सदर प्रौढाचे नाव रवी राठोड (वय 40) असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे रहाणार आहे. ही घटना सोमवारी (ता. 13 मार्च) सकाळी 9.30 च्या दरम्यान घडली. Death of an adult due to electric shock

याबाबत गुहागर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील विजापूरला रहाणारे दोनजण रवी रामु राठोड  आणि स्वप्नील देसु राठोड हे सध्या आपल्या काही सहकाऱ्यांसह गुहागर तालुक्यातील आबलोली येथे काम करत आहेत. रवी आणि स्वप्नील सोमवारी (ता. 13 मार्च) सकाळी आबलोली पेट्रोल पंपाजवळील गटारावर काँक्रीटचा स्लॅब ओतण्यासाठी स्टीलची जाळी बनविण्याचे काम करत होते. ही स्टिलची जाळी बनविण्यासाठी योग्य मापात लोखंडी सळ्यात तोडण्याचे काम सुरु होते. यावेळी रवीच्या हातातील सळी गटाराजवळून गेलेल्या वीजवाहिनीतील तारेला चिकटली. विद्यूत प्रवाह सुर असल्याने सळी तारेला चिकटाच क्षणी रवी राठोडच्या शरीरात वीज प्रवाहीत झाली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. लगेचच स्वप्नील राठोड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रवी राठोडला आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रवीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. Death of an adult due to electric shock

या घटनेची माहिती स्वप्नील देसु राठोड यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली, असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. दरम्यान शवविच्छेदनानंतर रवी राठोड यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.  Death of an adult due to electric shock

Tags: Death of an adult due to electric shockGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share136SendTweet85
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.