खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचा विद्यार्थी; भारतभरातून ३१२ विद्यार्थ्यांची निवड
गुहागर, ता. 13 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय,( Khare-Dhere-Bhosle College) गुहागरच्या गणित विभागात शिकत असलेल्या प्रियांशू प्रकाश आग्रे (द्वितीय वर्ष) याची आय.आय.टी. मद्रास येथे होणाऱ्या Mathematics Training And Talent Search Programme (MTTS 2023) साठी निवड झाली आहे. सदरचे उन्हाळी शिबिर दि. २२ मे ते १७ जून २०२३ दरम्यान पार पडणार आहे. Priyanshu Agre selected for MTTS 2023

MTTS हा भारतात चालणारा गणितातील सर्वात लोकप्रिय अंडरग्रेजुएट/ पदवीधर प्रशिक्षण कार्यक्रम आहे. गणितामध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम राष्ट्रीय उच्च गणित मंडळाने (NBHM) तयार केला आहे. हे या कार्यक्रमाचे ३१ वे वर्ष आहे. यासाठी यावर्षी भारतभरातून एकूण ३१२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. Priyanshu Agre selected for MTTS 2023
तरी महाविद्यालयातर्फे कु. प्रियांशू प्रकाश आग्रे व मार्गदर्शक शिक्षक श्री. अभिजीत यादव यांचे प्रभारी प्राचार्य श्री. पद्मनाभ सरपोतदार आणि सहकारी प्राध्यापकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले. Priyanshu Agre selected for MTTS 2023
