• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

युतीच्या कार्यकर्त्यांनी पोचवला गुहागरकरांचा संदेश

by Mayuresh Patnakar
March 13, 2023
in Guhagar
149 2
2
Statement regarding Guhagar Development Plan

गुहागर : येथील जनतेच्या मागणीचे निवेदन सामंत यांना देताना भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते

293
SHARES
838
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिले निवेदन

गुहागर, ता. 13 : विकासाच्या नावाखाली स्थानिकांना उध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करावा. असे निवेदन आज  उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले.  या निवेदनावर गुहागर शहरातील नागरिकांच्या सह्या आहेत.  9 मार्चला गुहागर शहरातील सर्व नागरिकांनी सभा भंडारी भवनला झाली. या सभेत तसा ठराव करण्यात आला होता. Statement regarding Guhagar Development Plan

शहरातील नागरिकांच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत हे समजून घेण्यासाठी 9 मार्चला भंडारी भवन येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेला राजकीय रंग चढू नये म्हणून गुहागर शहर नागरिक मंचची तात्पुरती स्थापना करण्यात आली. या सभेमध्ये अनेक नागरिकांनी विकास आराखड्याविरोधात मते मांडली. स्थानिकांची घरे उध्वस्त करुन गुहागरचा विकास कसा होणार, दुपदरी महामार्गापेक्षा मोठे, 12 व 18 मिटरचे रस्ते गल्ली बोळ दाखवले म्हणजे विकास होतो का. समुद्रावरुन जाणारा रस्ता लोकांचे नारळमाड तोडूनच का दाखविण्यात आला. शासकीय जमीनीवर हे आरक्षण का टाकले गेले नाही. सीआरझेडच्या 200 मीटर कक्षेत, आजही नारळ माड असलेले क्षेत्र निवासी आणि खरोखरच घरे असलेले क्षेत्र हरित क्षेत्र म्हणून दाखविण्याचे कारण काय. असे अनेक प्रश्र्न या सभेत नागरिकांनी उपस्थित केले. त्यानंतर गुहागर शहर उध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करावा. असा ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावावर नागरिकांनी सह्या केल्या. Statement regarding Guhagar Development Plan

जनमतचा हा कौल महाराष्ट्र शासनापर्यंत पोचावा म्हणून आज गुहागर शहरातील भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शासकीय निवासस्थानी पोचले. यामध्ये भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, गुहागर शहराध्यक्ष संगम मोरे, भाजयुमोचे हेमंत बारटक्के, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, निलेश मोरे, अमरदीप परचुरे  आदींचा समावेश होता. त्यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेवून गुहागरमधील जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवल्या व नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन मंत्री सामंत यांना दिले. Statement regarding Guhagar Development Plan

यावेळी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. सध्या अधिवेशन सुरु असल्याने या खात्याचा प्रभारी मी आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना गुहागरमधील जनतेच्या भावना सांगेन. तसेच या निवेदनाबरोबर गुहागरचा विकास आराखडा रद्द करण्याचे पत्रही त्यांना देईन. Statement regarding Guhagar Development Plan

दरम्यान गुहागर शहराचा विकास आराखडा फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द झाला.  शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील आठ ते दहा ठिकाणी प्रोजेक्टर लावून या आराखड्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे हरकती घेण्यासाठीचे अर्ज, सातबारा उतारा, असेसमेंटचा उतारा काढुन दिला. शहरात तीन ठिकाणी हरकती लिहिण्यात नागरिकांना मदत व्हावी म्हणून केंद्रही उभी करण्यात आली होती. जास्तीत जास्त नागरिकांच्या हरकती नगरपंचायत कार्यालयात पोचाव्यात यासाठी भाजप शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. Statement regarding Guhagar Development Plan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStatement regarding Guhagar Development PlanUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.