स्थापना दिनानिमित्त आरजीपीपीएलमध्ये कार्यक्रम
गुहागर, ता. 11 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) स्थापना दिनानिमित्त रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमधील युनिटने परेड आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि गुप्तचर विभागाचे जवान व अधिकारी सहभागी झाले होते. Parade of CISF personnel and blood donation

10 मार्च हा दिवस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. 54 व्या सीआएसएफ दिनानिमित्त आरजीपीपीएलमध्ये जवानांनी परेड केली. यावेळी आरजीपीपीएलचे एसओपी संजय अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर परेड कमांडर इन्स्पेक्टर अविनाश एस. सकळे यांनी संजय अग्रवाल यांना सलामी दिली. सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट पॉल के. वायफाय यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांनी स्थापना दिवसाच्या निमित्ताने पाठवलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. Parade of CISF personnel and blood donation

स्थापना दिनानिमित्त आरजीपीपीएलच्या सीआएसएफ युनिटमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात आरजीपीपीएलचे जॉन फिलिप, आशिष पांडे, सीआयएसएफचे सहाय्यक कमांडंट अकेश्वर सिंग यांच्यासह 20 जवानांनी रक्तदान केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, रत्नागिरी या संस्थेने रक्तदान शिबिरासाठी साह्य केले. यावेळी अग्निशमन विभागाचे निरीक्षक कीर्ती कुमार, निरीक्षक/कार्यवाह नंदलाल चित्ते, गुप्तचर विभागाचे उप/कार्यवाह राहुल मिश्रा, अहिकार दीपक अहिकर, संभाजी रजित जाधव आणि पी कन्नन उपस्थित होते. Parade of CISF personnel and blood donation

