• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

उमराठ पहिले ऑडिओ प्लस गाव म्हणून घोषित

by Mayuresh Patnakar
March 11, 2023
in Guhagar
194 2
0
Umrath announced as first Audio Plus village
381
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.11 : शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभिनयाअंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत १००% हागणदारीमुक्त गाव आहे. तसेच शासनाच्या विविध योजना/ सुविधा राबविण्याचा मान पटकावला आहे. त्याबद्दल उमराठ गाव हे गुहागर तालुक्यातील पहिले ऑडिओ प्लस गाव म्हणून पंचायत समिती गुहागर तर्फे घोषित करण्यात आले आहे. Umrath announced as first Audio Plus village

शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभिनयाअंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत १००% हागणदारीमुक्त गाव म्हणजेच गावात घरोघरी शौचालय व १००% नियमित शौचालयाचा वापर तसेच नियमितपणे घनकचऱ्याचे नॅडेप, खत खड्डे व गांडूळखत द्वारे व्यवस्थापन करणे आणि सांडपाण्याचे शोषखड्डे व परसबागेद्वारे व्यवस्थापन करणे. या अटीतटींचे पद्धतशीरपणे पालन करून हागणदारीमुक्त गाव जी ग्रामपंचायत ग्रामसभेत शपथ घेऊन घोषित करेल त्या ग्रामपंचायतीच्या गावाला हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार सर्व अटीतटींचे पालन करून अत्यावश्यक ती कामे/सुविधा राबवून ग्रामपंचायत उमराठने पुढाकार घेऊन आपल्या उमराठ व उमराठ खुर्द या दोन्ही महसुली गावांत गुहागर तालुक्यात सर्व प्रथम वरील सर्व योजना/ सुविधा राबविण्याचा मान पटकावला. असून त्याबद्दल उमराठ गाव हे गुहागर तालुक्यातील पहिले ऑडिओ प्लस गाव म्हणून पंचायत समिती गुहागर तर्फे घोषित करण्यात आले आहे. Umrath announced as first Audio Plus village

बुधवार दि. ८ मार्च २०२३ रोजी ग्रामपंचायत उमराठच्यावतीने ग्रामदेवता श्री नवलाई देवीची सहाण येथे दुपारी २.०० वा. घेतलेल्या विशेष ग्रामसभेत अधिक चर्चा होऊन सर्वानुमते खालील प्रमाणे शपथ घेऊन हागणदारीमुक्त अधिक गाव घोषित करण्यात आले होते. Umrath announced as first Audio Plus village

या संदर्भात घेतलेली शपथ

आम्ही उमराठ ता. गुहागर, जि. रत्नागिरी गावातील महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द येथील नागरिक असून आमच्याकडे घरोघरी शौचालय आहेत. आम्ही महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द गावातील सर्वजण नियमितपणे शौचालयाचा वापर करीत आहोत. उघड्यावर कोणी शौचालयास जात नाही. महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द गावात नियमितपणे घनकचऱ्याचे नॅडेप, खत खड्डे व गांडूळखत द्वारे व्यवस्थापन केले जाते तसेच सांडपाण्याचे शोष खड्डे व परसबागेद्वारे व्यवस्थापन केले जाते. मी आज स्वच्छ भारत अभिनयाअंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आम्ही आमचे गाव उमराठ अंतर्गत महसूल गाव उमराठ व उमराठ खुर्द हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून आज रोजी घोषित करीत आहोत. Umrath announced as first Audio Plus village

एकंदरीत पंचायत समिती गुहागर तर्फे तालुक्यातील पहिले ऑडिओ प्लस गाव म्हणून उमराठ गाव घोषित केल्याबद्दल  तालुक्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. उमराठ गावाला मिळालेल्या या बहुमानाचे संपूर्ण श्रेय हे दोन्ही महसुली गावांतील सर्व वाड्यांतील ग्रामस्थांना, ग्रामसेवक शिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे असिस्टंट नितीन गावणंग, डाटा ऑपरेटर साईस दवंडे, रोजगार सेवक प्रशांत कदम यांच्या मेहनतीला जाते. असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी म्हटले आहे. Umrath announced as first Audio Plus village

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUmrath announced as first Audio Plus villageUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share152SendTweet95
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.