• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 March 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरेकर प्रतिष्ठान तर्फे मोफत हरकत फॉर्म सुविधा

by Ganesh Dhanawade
March 10, 2023
in Guhagar
183 2
0
Free objection form by Arekar Foundation
359
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 10 : गुहागर शहर नगरपंचायतीने तयार केलेला शहर विकास आराखडा (DP) तयार झाला असुन त्याबाबत खुप प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी लागणारे हरकत फॉर्म सुविधा उद्या शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी 3:०० वाजेपर्यंत, सदानंद गेस्ट हाऊस, गुहागर खालचापाट (श्री. पद्माकर आरेकर) यांचे निवासस्थान मोफत देण्यात येणार आहेत. Free objection form by Arekar Foundation

गुहागर शहर नगरपंचायतीने तयार केलेला शहर विकास आराखड्यामध्ये कुणाचे घर, कुणाच्या वाड्या रस्ता रुंदीकरणमध्ये जात आहेत. तसेच कुठे जागेवर आरक्षण तर कुठे जागा ग्रीन झोन करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी गुहागर शहराच्या या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्यावर हरकत घेणे गरजेचे आहे. यासाठी लागणारे हरकत फॉर्म सुविधा लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर व श्री वराती देवी झेरॉक्स सेंटर यांच्या वतीने मोफत दिली जाणार आहेत. यासाठी उद्या शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी गुहागर वासीयांना मोफत हरकत घेण्यासाठी लागणारे फॉर्म सुविधा दिली जाणार आहे. Free objection form by Arekar Foundation

या फॉर्मसाठी येताना नागरिकांनी घरपट्टी व 7/12 घेऊन यावे. तसेच जागेचा नकाशा आणि असेसमेंट उतारा असेल तर आणावा नसला तरी चालेल, अशी विनंती लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर व श्री वराती देवी झेरॉक्स सेंटर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या फॉर्मसाठी सकाळी १०:३० ते दुपारी 3:०० वाजेपर्यंत, सदानंद गेस्ट हाऊस, गुहागर खालचापाट (श्री. पद्माकर आरेकर) यांचे निवासस्थान येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 9975198547 / 9545471234 या नंबरवर संपर्क करण्यात यावा. Free objection form by Arekar Foundation

Tags: Free objection form by Arekar FoundationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share144SendTweet90
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.