आपल्यातील कलागुणांचा शोध घ्या; प्रा. रश्मी आडेकर
गुहागर, ता. 10 : महिलांनी स्वतःचा शोध घेऊन आत्मनिर्भर व्हायचं आणि स्वतःला ओळखायचं, स्वतःचा शोध महत्त्वाचा आहे. आपल्यातील कलागुणांतील कलागुणांचा शोध घ्या., स्वतःला घडवा. महिला सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा. रश्मी आडेकर केले. Various programs on Women’s Day

महिला दिनानिमित्त तहसील कार्यालय गुहागर व ज्ञानरश्मी वाचनालय याचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्य कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिभा वराळे तहसीलदार गुहागर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रश्मी आडेकर, सावी साळवी व ज्योती परचुरे उपस्थित होत्या. यावेळी हळदीकुंकू, फनी गेम, प्रश्न मंजुषा तसेच वरचापाट दुर्गादेवी वाडी येथील महिलांनी समूह नृत्य केले. यावेळी सावी साळवी यांनी स्वतःचा जीवन प्रवास थोडक्यात सांगून महिलांनी महिलांना मदत केली तरच महिला पुढे जाऊ शकतील. जिथे स्त्रीला मदतीची गरज आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या नात्यांच्या माध्यमातून स्त्रीला मदत करत रहा कारण समाज घडण्यामध्ये स्त्रीचा सर्वप्रथम वाटा आहे असे सांगीतले. Various programs on Women’s Day

यावेळी गुहागर तालुक्यातील तीस महिलांचा सत्कार करण्यात आला. यात वेदिका विजय लोखंडे- शेतीक्षेत्र (गुहागर येथील महिला शेतकरी, पशुधन विकास, भाजीपाला लागवड), शशिकला वाडकर वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली कोविड लसीकरणबाबत उल्लेखनीय कार्य, रश्मी आडेकर- प्राध्यापिका खरे ढेरे भोसले महाविद्यालय गुहागर, नेहा राठोड गुहागरातील पहिल्या महिला वायरमन म.रा.वि. म.मंडळ गुहागर, पुर्वा प्रदिप पवार, महिला वाहक एस. टी. डेपो गुहागर, महिला पोलिस गुहागर, काळे मॅडम, दंतचिकीत्सक गुहागर, सावी संदेश साळवी, महा ई सेवा केंद्र संचालक, आबलोली, सुरेखा प्रसाद वैद्य, गुहागरमधील पहिल्या महिला इंजिनिअर, अपर्णा मंदार आठवले महिला पॅथालॉजीस्ट, स्नेहा संतोष वरंडे, सामाजिक क्षेत्र, पहिल्या महिला नगराध्यक्ष, शलाका खरे दुर्गदेवी संस्थानाचे ठिकाणी धार्मिक लोकांना/पर्यटकांना उत्तम प्रकारेमाहिती व सेवा देणे, सोनाली संदिप घाडे उत्कृष्ट ग्रंथपाल जिल्हा व तालुका स्तरावर आदर्श ग्रंथपाल पुरस्कार प्राप्त, सोनाली अनंत वरंडे, कराटे प्रशिक्षक, मनश्री मनोज शेटये, ब्युटीपार्लर क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे सेवा, शिल्पा बहनजी, प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्रसंचालिका गुहागर, धार्मिक व अध्यात्मिक कार्य, दिप्ती सुकुमार मुंजे, आयडीबीआय बँक मॅनेजर, गुहागर, मृणाल दिक्षित, शिवणकाम, विणकाम. अमृता जोशी व शिवानी ओक, पिग्मी ऐजंट, स्नेहल निखिल ओक, कबड्डी पट्टू मान्यताप्राप्त पंच,. सुषमा वासुदेव शिंदे, शिक्षिका, जीवन ज्योती विशेष शाळा (मतिमंद मुलांची शाळा), धनश्री बावधनकर, शिक्षण क्षेत्र, गुंजन शर्मा, खाजगी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी सिध्दी संतोष सावंत, रास्तभाव रेशनदुकानदार जामसुद, ज्योती परचुरे, सांस्कृतिक क्षेत्र, वर्षा आठवले, सांस्कृतिक क्षेत्र, व्याडेश्वर, अस्मिता केदार भोसले कोषार अधिकारी, राधिका मोरे संगणकीय प्रशिक्षक याचा सत्कार करण्यात आला. तर बालवाचक वरद केदार भागवत व जेष्ठ वाचक ऊषा याचा सत्कार करण्यात आला. Various programs on Women’s Day

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनाली बावधनकर यानी केले.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्चना देशमुख,तारे, स्नेहा वरंडे, निशा कांबळे, सानीका घाडे, शामली घाडे व सानिका सांगळे यानी मेहनत घेतली. Various programs on Women’s Day

