• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सरपंच निवडणुकीत भाजपाचा ठाकरे गटाला धक्का

by Manoj Bavdhankar
March 9, 2023
in Guhagar
203 2
0
Katale Sarpanchpadi Priyanka Surve
399
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामपंचायत काताळे सरपंचपदी प्रियांका सुर्वे विराजमान

गुहागर, ता. 09 : कातळे ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणुकीत महाविकास आघाडीकडे नऊपैकी सहा जागा असताना भाजपच्या प्रियांका सुर्वे यांनी 5 मते घेत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रावणी नाचरे याना फक्त 3 मते मिळाली. जागतिक महीला दिनी आणि ग्रामदेवता महामाई-सोनसाखळीच्या शिमग्याच्या दिवशी सौ. प्रियांका निलेश सुर्वे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. Katale Sarpanchpadi Priyanka Surve

Katale Sarpanchpadi Priyanka Surve

तालुक्यातील तवसाळ, तवसाळ खुर्द,कातळे या तीन महसुल गावांचा समावेश असणा-या कातळे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 साली झाली होती. यावेळी महाविकास आघाडीने बाजी मारत भारतीय जनता पार्टीच्या प्रियांका सुर्वे यांचा पराभव केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व करत सरपंच पद राष्ट्रवादीला मिळवून देणारे तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय मोहिते यांनी काही दिवसापूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट बाजी मारणार अशी सर्वत्र चर्चा होती. मात्र भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना दोन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीच्या झालेल्या पराभवाची सल कायम होती. त्या पराभवाची परतफेड करण्याची निर्माण झालेली संधी निलेश सुर्वे यांनी योग्य उपयोगात आणत अतिशय संयमी आणि शांतपणे दोन वर्षांपूर्वी पराभूत झालेल्या आपल्या पत्नीला प्रियांका सुर्वे यांना सरपंच पदी विराजमान केले. महाविकास आघाडीकडे नऊपैकी सहा जागा असतानाही प्रियांका सुर्वे यांना 5 मत मिळाली, एक मत बाद झाले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रावणी नाचरे याना फक्त 3 मते मिळाली. Katale Sarpanchpadi Priyanka Surve

प्रियांका सुर्वे यांना मिळालेली अधिकची 2 मते कोणाची ? बाद झालेले मत कोणाचे ? आणि बाद झालेले मत हे मुद्दाम बाद करायला लावले का ? याची जोरदार चर्चा तवसाळ कातळे पंचक्रोशीमध्ये सुरू आहे. महिला दिनाच्या आणि तवसाळ पंचक्रोशीची ग्रामदेवता श्री महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगा उत्सवाच्या दिवशी प्रियंका सुर्वे यांचा अनपेक्षितपणे झालेला विजय हा पंचक्रोशीमध्ये जसा चर्चेचा ठरत आहे तसेच वाणिज्य पदवीधर व डीएड धारक असणाऱ्या या उच्चशिक्षित महिलेवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षावही होत आहे. राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांना एकत्रित ठेवण्यात आलेले यश ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर विजय मोहिते यांना टिकवता आले नसल्याची चर्चाही पंचक्रोशीत रंगली आहे. Katale Sarpanchpadi Priyanka Surve

मी भाजप तालुका अध्यक्षांची पत्नी म्हणून भाजपाची सदस्य नसून माझे माहेरचे (कोंडकारुळ) घराणे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहे. मी भारतीय जनता पार्टीची सदस्य असले तरी आत्ता सरपंच म्हणून जो कार्यभार स्वीकारला आहे तो तीन महसूल गावांची मिळून निर्माण झालेल्या कातळे ग्रामपंचायतीचा आहे. त्यामुळे मी सरपंच ही काताळे ग्रामपंचायतीची आहे. माझ्या शिक्षणाचा जेवढा फायदा ग्रामपंचाय कार्यक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, केंद्राच्या – राज्याच्या योजना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी, पर्यटनातून रोजगार निर्मितीसाठी मला कसा करून घेता येईल याकडे मी जास्त लक्ष देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांनी सांगितले आहे. Katale Sarpanchpadi Priyanka Surve

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKatale Sarpanchpadi Priyanka SurveLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share160SendTweet100
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.