गुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली येथे शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. आबलोली-खोडदे परीसरात दुचाकीवरून शोभा यात्रा काढण्यात आली होती. Various activities by Shivrai Mawle Foundation
यावेळी शैक्षणिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थांच्या कला गुणांना चालना देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अंगणवाडी ते इयत्ता ७ वी पर्यंत लहान व मोठा गट अशा दोन गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक वेदा विक्रांत पागडे, द्वितीय क्रमांक आरुष प्रदीप पांचाळ व तृतीय क्रमांक ओम प्रकाश नेटके यांनी प्राप्त केले. तसेच मोठ्या गटात प्रथम क्रमांक शरण्या सागर भडंगे, द्वितीय क्रमांक राम अर्जुन बिरादार व तृतीय क्रमांक रुद्रांश रविंद कुळ्ये यांनी प्राप्त केले. या सर्व विजेत्या विद्यार्थांना वही, पेन्सिल, प्रमाणपत्र व रोख रकमेचे बक्षीस देवून गौरविण्यात आले. Various activities by Shivrai Mawle Foundation

तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक ( ग्रुप डान्स) हिरण्या पालशेतकर व दुर्वा पवार, द्वितीय क्रमांक आसावरी प्रदीप पांचाळ, तृतीय क्रमांक अक्षरा सावंत व उत्तेजनार्थ (ग्रुप डान्स ) निहार पांचाळ, मुस्कान पांचाळ, आसावरी पांचाळ, गौरांग पांचाळ, संग्राम काळोखे, वैष्णवी काळोखे यांनी यश प्राप्त केले. व मोठा गटामध्ये प्रथम क्रमांक अस्मि रेपाळ, द्वितीय क्रमांक (ग्रुप डान्स) निहार पांचाळ, साई नेटके, रेहान मुलाणी, सानवी सावंत, लावण्या व आराध्या, तृतीय क्रमांक कार्तिकी रेपाळ यांनी यश मिळविले. या विजेत्या स्पर्धकांना चषक, रोख रकमेचे बक्षीस, प्रमाणपत्र, वही व पेन्सिल देवून गौरविण्यात आले. तसेच विशेष बक्षीस मध्ये अंगणवाडी सर्व मुले (भारताचे संविधान) व नुरवी पांचाळ (भगवा फडकला) या दोघांना रोख रकमेचे बक्षीस व प्रमाणपत्र, वही व पेन्सिल देवून गौरविण्यात आले. Various activities by Shivrai Mawle Foundation
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभाग यामध्ये आबलोली गावचे सुपुत्र व मुंबई मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अमोल महादेव पवार यांनी शिक्षक निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचे प्रतिष्ठानच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून अध्यक्ष रमेश पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्री विश्वकर्मा पांचाळसुतार समाज मंडळाचे अध्यक्ष रमेश शंकर पांचाळ यांनी काम पाहिले. Various activities by Shivrai Mawle Foundation
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रणव झगडे, ऋषिकेश पांचाळ, प्रथमेश पांचाळ, शुभम पांचाळ, प्रदीप पांचाळ, प्रमोद गोणबरे, विनीत पांचाळ, निहार पांचाळ, दिलीप पांचाळ, जितेंद्र पांचाळ, सचिन घाणेकर, वैभव जुवळे, दिपक पांचाळ, सर्वेश पांचाळ, रुपाली पांचाळ, साक्षी पांचाळ, दिव्या पांचाळ यांचे सहकार्य लाभले. Various activities by Shivrai Mawle Foundation
या बक्षीस वितरण समारंभसाठी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमेश शंकर पांचाळ, उपाध्यक्ष संजय पांचाळ, आबलोली निर्मल ग्रामपंचायत सरपंच वैष्णवी नेटके, सदस्या पायल गोणबरे, वासुदेव पांचाळ, शिवराय मावळे प्रतिष्ठानचे संस्थापक प्राध्यापक नितेश सुरेश पांचाळ यांसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते. नितेश पांचाळ यांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्व व व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी प्रबोधन केले. नितेश पांचाळ यांनी आभार मानले. Various activities by Shivrai Mawle Foundation
