गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त
गुहागर, ता. 04 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण उर्फ सिदूबाबा सोमण यांचा स्मृतिदिन व वार्षिक बक्षिस वितरण समारंभ रंगमंदिर मध्ये पार पडला. यावेळी कु. आर्या मंदार गोयथळे, हर्षदा शाम नारकर, ऋषिकेश वसंत आठवले या तीन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. Annual prize distribution ceremony at Guhagar

विद्यार्थ्यांनी आपले आईवडील व शिक्षकांनी केलेल्या संस्कारांनी स्वतःला संपन्न बनवावे, हिच कै. शिदूबाबा सोमण यांना खरी आदरांजली ठरेल. असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षक नेते दत्तात्रय गुरव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सांगितले. या समारंभाला गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदिप भोसले, संचालक पराग भोसले, बालविद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती आरेकर, गौरी घाडे, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे, सोनाली हळदणकर, मनीषा सावंत, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. Annual prize distribution ceremony at Guhagar

यावेळी गायन, वादन, क्रीडा स्पर्धा यात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांनाहि मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांनी केले. तर उपमुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांनी कवितेच्या माध्यमातून शिदूबाबा यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर गंगावणे, हर्षाराणी देवकर, सौ. मिना खानविलकर यांनी केले. Annual prize distribution ceremony at Guhagar
