खा. सुनिल तटकरे आणि आ. भास्कर जाधव यांना
गुहागर, ता. 28 : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या गुहागर तालुका अध्यक्ष सारिका हळदणकर व अन्य कर्मचाऱ्यांच्या वतीने खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव यांना निवेदन दिले. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या गुहागर तालुका अध्यक्ष सारिका हळदणकर व अन्य कर्मचाऱ्यांच्या जवळ चर्चा केली. Statement for Anganwadi Demands

पोषण आहार संदर्भातील बचत गटांकडून देण्यात आलेल्या पोषण आहाराची बिले देण्यात आली. परंतु अंगणवाडी सेविकांकडून देण्यात आलेली पोषण आहारची बिले अद्याप देण्यात आली नाहीत. ही बिले त्वरित मिळण्यासंदर्भात कार्यवाही व्हावी, असे सांगितल्यानंतर तटकरे यांनी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे विचारणा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात केली. अधिकाऱ्यांना तात्काळ बीले काढण्यासंदर्भात सूचना तटकरे यांनी दिल्या. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन देण्याबाबत अनियमितपणा असतो, तर मानधन वेळेत मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकार मान्य रास्त धान्य बंद करण्यात आले असल्याची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली. त्यावर यासंदर्भात माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊन आपल्याला पत्रव्यवहार करतो असे तटकरे यांनी सांगितले. Statement for Anganwadi Demands

आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले की, अर्थ संकल्प अधिवेशनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत आवाज उठविला जाईल व नक्कीच न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी तालुका अध्यक्ष सारिका हळदणकर, मयुरी रांजाणे, राधा आंबेकर, स्नेहल दळवी, सुस्मिता सोलकर, वणे, असगोलकर आदी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. Statement for Anganwadi Demands
