• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षि पुरस्कार जाहीर

by Ganesh Dhanawade
February 27, 2023
in Guhagar
96 0
0
Gnan Maharshi Award to Balasaheb Labde
188
SHARES
536
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 : मराठबोली संस्था, पुणे यांच्यावतीने खरे -ढेरे- भोसले महाविद्यालय गुहागरचे मराठी विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना त्यांच्या एकूण साहित्य सेवेसाठी ज्ञानमहर्षि हा सन्मानाचा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. परमेश्वर उमरदंड यांनी जाहीर केला आहे. सन्मानपुर्वक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. Gnan Maharshi Award to Balasaheb Labde

यापुर्वी हा पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, गझलकार रमन रणदिवे यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब लबडे हे दीर्घकाळापासून उत्तम अध्यापन करून शिक्षक म्हणून नावलौकीक मिळवत आहेत. तसेच समीक्षक, कादंबरीकार, कवी, गझलकार, गीतकार ,संशोधक, संपादक, साहित्य चळवळीचे मानकरी, नामवंत वक्ते, अनेक राज्यस्तरिय व राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी, विविध वाहिन्यांवर व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कविता मनामनातली, खारवी बोलीच्या कविता, विडंबन कविता, असे कार्यक्रम सादर करणारे, पसायदान प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. Gnan Maharshi Award to Balasaheb Labde

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

गेल्या २३ वर्षांपासून मराठी विभागप्रमुख म्हणून सेवेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. ५ विद्यार्थ्यी संशोधन करीत आहेत. त्यांची एकूण १६ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी कादंबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील पिपिलिका मुक्तिधाम सारख्या कादंबरीचे लेखन, नामदेव ढसाळ, नारायण सुर्व यांच्या नंतर मुंबईचे दखलपात्र चित्रण करणारा मुंबई बंबई बाँम्बे कवितासंग्रह, चित्रे कोलटकर यांच्यानंतर महाद्वार सारखा मराठी कवितेत मैलाचा दगड ठरलेला कविता संग्रह, मराठी कादंबरीतील पहिल्या रांगेतील ठरलेली अनोखी शेवटची लाओग्राफिया ही कादंबरी. १९९० नंतरची थीम कविता हे संपादन मराठील पहिले प्रायोगिक संपादन,”एक कैफियत” सारखा भन्नाट गझल संग्रह, ब्लाटेंटिया सारखा थीम कवितासंग्रह, “वाटर स्टोरिज” या सनस्टोन प्रकाशन अमेरिका, प्रकाशित पुस्तकातुन त्यांच्या दोन कथा कँनडा, युरोप, जर्मनीसह जगभरातील ग्रंथालयात पोहचल्या आहेत. शिष्यवृत्ती “नौटंकी” या आगामी चित्रपटासाठी त्यांची गाणी आहेत. मराठीतील दिग्गज समीक्षक रत्नाकर मतकरी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. आनंद पाटील, डॉ. लुलेकर, लक्ष्मीकांत देशमुख, ए. के. शेख, डॉ. सांगोलेकर आदींनी त्यांची दखल घेऊन त्यांचे स्थान अधोरेखन मराठी साहित्यात केले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. Gnan Maharshi Award to Balasaheb Labde

Tags: Gnan Maharshi Award to Balasaheb LabdeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share75SendTweet47
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.