खासदार तटकरेंनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खडसावले
गुहागर, ता. 26 : महामार्गादरम्यान राहीलेली किरकोळ कामे ठेकेदाराकडून का करुन घेत नाही. तुम्हीच त्याला सुट देता का. नगरपंचायतीमधील जलवाहीन्यांचे कामासाठी भु संपादनाची वाट का पहाता. असे खडसावत खासदार तटकरेंनी तहसीलदारांना ठेकेदाराला नोटीस काढण्याची सूचना केली. तसेच 10 मार्चला होणाऱ्या दिशाच्या सभेत अहवाल द्या. अशी सूचना महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खासदार तटकरे यांनी केल्या. MP Sunil Tatkare on visit to Guhagar

रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे शनिवारी (ता. 25) गुहागरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, आरजीपीपीएल, कोकण एलएनजी आणि एल ॲण्ड टीचे अधिकारी यांच्या बैठका घेतल्या. शासकीय विभागांच्या बैठकीत गुहागर विजापूर महामार्गाच्या कामाबाबत झालेली चर्चा गाजली. शृंगारतळीतील महामार्गाच्या कामात तुटलेल्या जलवाहीन्या, पालपेणे फाट्यावरील पुल, गुहागरच्या शासकीय विश्रामगृहापासून शुन्य कि.मी.पर्यंत राहीलेले काम, मार्गताम्हाने गावातील अर्धवट कामांची माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. यापैकी जलवाहीन्यांचे काम अर्धवट का असे विचारल्यावर ठेकेदाराने उद्यापासून सुरु करतो असे सांगितले. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
महामार्गाच्या कामामुळे प्रवासी निवारे तुटले ते कधी पूर्ण करणार असे विचारल्यावर पुन्हा एकदा ठेकेदाराने उद्यापासून काम सुरु करतो असे सांगितले. गुहागरमधील काम भुसंपादनाच्या प्रक्रियेमुळे अर्धवट राहीले आहे. मात्र तेथील जलवाहीन्यांच्या कामाला का सुरवात केली नाही. याही प्रश्र्नांचे उत्तर उद्यापासून आल्यावर खासदार तटकरे भडकले. त्यांनी तहसीलदारांना ठेकेदाराला नोटीस देण्याची सूचना केली. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
सभेतूनच थेट प्रांत पवार यांना फोन लावून भुसंपादन प्रक्रिया पूर्ण होवून अवार्ड कधी जाहीर करणार असे विचारले. संपूर्ण कार्यवाहीला अधिक वेळ लागणार असल्याचे लक्षात येताच खासदारांनी गुहागरमध्ये 3 मार्चला तहसीलदार, नगराध्यक्ष व जागा मालकांची सभा घ्या. किती जागा जाणार, मोबदला किती देणार याची माहिती देवून जागा मालकांना विश्र्वासात घ्या व पुढील कामाला सुरवात करावी. अशी सूचना सभेतूनच प्रांताना केली. यावेळी मार्गताम्हानेतील शिल्लक 700 मिटर कामाचाही निर्णय करावा असे सांगितले. शृंगारतळी येथील एका पुलाचे संपूर्ण काम होणे बाकी आहे. त्या कामाला आवश्यक असलेला वळण रस्ता मिळत नसल्याचे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मग हा रस्ता तसाच ठेवणार का, पुलाचे कामच करायचे नाही का. असा उलट प्रश्र्न खासदार तटकरेंनी विचारला. अखेर ग्रामपंचायत, तहसीलदार व महामार्गचे अधिकारी यांनी एकत्रीतपणे हा विषय सोडवावा व पुलाचे कामही सुरु करावे. अशा सूचना त्यांनी केल्या. MP Sunil Tatkare on visit to Guhagar

महामार्गाच्या निकृष्ट दर्जा, रस्ता खचणे, तडे जाणे याबाबत चर्चा सुरु झाल्यावर महामार्गाचे अधिकारी ठेकेदाराला सावरुन का घेतात. प्रत्यक्ष काम सुरु असताना आपण काम योग्य प्रकारे होते का हे पाहीले नाही का. रस्त्याला तडे जाणे समजु शकतो मात्र रस्ता खचला याचा अर्थ तेथे भराव टाकताना निर्देशित केलेल्या सूचनांप्रमाणे काम झाले नाही. याची जबाबदारी तुमची नाही का. असे तटकरेंनी अधिकाऱ्यांना विचारले. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. अशा प्रकारे गुहागर विजापूर महामार्गामधील प्रत्येक अर्धवट कामाची चर्चा आज खासदार तटकरेंनी घडवून आणली. मार्ग काढणे शक्य असलेले विषय लगेच मार्गी लावले. त्यामुळे या कामांना आता सुरवात होईल. अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. MP Sunil Tatkare on visit to Guhagar
या सभेला गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र हुमणे गुरुजी, शंकर कांगणे, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर बागकर, राष्ट्रवादीच्या गुहागर तालुका महिला अध्यक्ष व नगरसेविका सौ. स्नेहा भागडे, खजिनदार दिपक शिरधनकर, उपाध्यक्ष तुषार सुर्वे, युवती तालुकाध्यक्ष व वरवेलीच्या उपसरपंच मृणाल विचारे, महिला उपाध्यक्षा, सौ. मानसी शेटे, गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, दिपक जाधव, साहील आरेकर, गौरव वेल्हाळ, सौ. स्वाती कचरेकर, सिध्दी आरेकर, प्रसाद विचारे, पाटपन्हाळे उपसरपंच आसीम साल्हे, तालुकाध्यक्ष वैभव आदवडे. तालुका सचिव प्रदिप बेंडल आदी उपस्थित होते. MP Sunil Tatkare on visit to Guhagar