• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुका तेली समाजाचा महिला हळदीकुंकू समारंभ

by Manoj Bavdhankar
February 26, 2023
in Guhagar
104 1
0
Women's Haldikunku Ceremony of Teli Samaj
204
SHARES
582
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

समाजातील महिलांनी संघटीत होणे काळाची गरज; श्रेया महाडिक

गुहागर, ता. 26 : तेली समाजातील महिलांनी संघटीत होणे काळाची गरज असून हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्याला एकीचे बळ निर्माण करावयाचे आहे. तसेच महिलांनी समाजाच्या प्रत्येक कार्यात पुढाकार घेतलाच पाहीजे असे मत चिपळूण तालुका तेली समाज महिला अध्यक्षा श्रेया महाडीक यांनी व्यक्त केले. गुहागर तालुका तेली समाज महिला मंडळाच्या वतीने पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. Women’s Haldikunku Ceremony of Teli Samaj

Women's Haldikunku Ceremony of Teli Samaj

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच श्रीमहालक्ष्मीदेवता, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन, पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रास्ताविका मध्ये दिव्या किर्वे यांनी महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाचा उद्देश कथन केला. तसेच यापुढे ही गुहागर तालुक्यातील महिलांनी समाजाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. उपस्थित महिला पदाधिकाऱ्याचे महिला मंडळाच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आले. हळदी कुंकू समारंभात सर्व महिलांना हळदकुंकू लावून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रत्येक गावातील महिला मंडळ अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. Women’s Haldikunku Ceremony of Teli Samaj

यावेळी श्रद्धा राऊत, दुर्वा रहाटे, गुहागर ता. तेली समाज महिला अध्यक्ष दिव्या किर्वे, रोहीणी रहाटे, प्राची पवार, रेश्मा रसाळ, रिया राऊत, सीमा किर्वे, अक्षता झगडे, अपर्णा राऊत, सुलोचना महाडिक, अंजली महाडिक, सुप्रिया रहाटे, शालिनी चव्हाण, अनिता राऊत, राजश्री राऊत, माजी अध्यक्ष शशिकांत पवार, पत्रकार गणेश किर्वे, दिलीप जाधव, सुरेश महाडिक यांच्यासह तालुक्यातून बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. Women’s Haldikunku Ceremony of Teli Samaj

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWomen's Haldikunku Ceremony of Teli Samajगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.