विधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभात सहभाग
गुहागर, ता. 25 : येथील श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान मधील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा नुकताच भव्यदिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित हळदीकुंकू समारंभात विधवा महिलांना सन्मानाने वाण देण्यात आले. Ceremony of Guhagar village deity is complete
यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुहागर ते श्री भैरीव्याघ्रांबरी मंदीर पर्यंत ढोल ताशांचे गजरात नूतन पाषाण मुर्ती तसेच नवीन पालखीची भव्य मिरवणुक काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी विधीयुक्त कार्यक्रमास, प्रधान संकल्प, अग्नी उतारण, जलाधिवास शैया आणि पिठ देवता स्थापना करण्यात आली. विधीयुक्त कार्यक्रम, पिठ देवता हवन, तत्वन्या होम, नुतन मुर्तीचा पुन: प्रतिष्ठा, षोडशोपचार पुजा पार पडली. Ceremony of Guhagar village deity is complete
यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ही सर्व जबाबदारी देवस्थानने शहरातील वाड्यांमधील महिलांना देण्यात आली होती. विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतले आहे. विधवा महिलांना मान-सन्मानाने वागता यावे यासाठी भैरी व्याघ्रांबरी देवस्थानने शहरातील विधवा महिलांना या हळदीकुंकू समारंभात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरातील विधवा महिलांनी प्रतिसाद दिला. त्यांना वाण देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अन्य समाजातील महिलांनीही सहभाग घेतला होता. हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरातील महिलांनी मेहनत घेतली. Ceremony of Guhagar village deity is complete
सायंकाळी स्थानिक भजने पार पडली. स्वर साधना महिला भजन मंडळ खालचापाट, नूतन गोपाळ कृष्ण भजन मंडळ जांगळेवाडी, स्वयंमप्रकाश गोयथळे भजन मंडळ खालचापाट, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वरचापाट यांची सुस्वर भजने झाली. या सोहळ्यासाठी शहरातील सर्व महिलांनी मंदिर परिसर व बाजारपेठ, शिवाजी चौक हा परिसर स्वच्छ करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफेद रंगाने रांगोळी काढली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागरचे अध्यक्ष शरद शेटे, खजिनदार मुरलीधर बागकर, सेकेटरी अरुण गुरव व सर्व कमिटी सदस्य व सर्व मानकरी, ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली. Ceremony of Guhagar village deity is complete