गुहागर, ता. 24 : आम आदमी पक्ष दापोली तालुका संयोजकपदी कार्यरत असलेले श्री.परेश साळवी यांची आम आदमी पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संयोजकपदी अंतरिम नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती श्री ज्योतिप्रभा पाटील येत्या काही दिवसांसाठी पक्षाचे काम करण्याकरिता गैरहजर असल्याने करण्यात आली आहे. Salvi appointed as district coordinator

जिल्हाप्रमुखपदी पुढील नियुक्ती होईपर्यंत श्री.साळवी या पदावर असतील, आणि लवकरच स्थानिक समिती व सदस्यत्वाचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या नियुक्तीबाबत रत्नागिरी जिल्ह्यातून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांकडून व हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहेत. Salvi appointed as district coordinator
