विद्यार्थी गुणगौरव सोहळा व हळदीकुंकू समारंभ
गुहागर, ता. 24 : तेली समाजोन्नती संघ ता. चिपळूण व गुहागर यांच्या वतीने महाशिवरात्री स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई येथे पार पडला. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उद्योजक व सल्लागार कमलाकर महाडीक यांनी भुषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अतुल अ. लांजेकर, ठाणे श्री संताजी सहाय्यक संघ अध्यक्ष कमलाकर वि. शेलार, सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी अनंत यशवंत रसाळ, कार्याध्यक्ष जयवंत गं. रसाळ, उपाध्यक्षा कविता क. रहाटे, सल्लागार अशोक रहाटे या मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरवात झाली. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये इंडिया इंटरनॅशनल डान्स स्पर्धा २०२३ जी दुबई येथे संपन्न झालेल्या लावणी नृत्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली कु.श्वेता संतोष रहाटे हीने सुंदर लावणी सादर केली. तसेच कु.प्रियांका हरिश्चंद्र चव्हाण व आरोळी संतोष रहाटे यांचीही नृत्य छान झाली. काही समाजबांधवांनी बहारदार गाणी म्हणून वातावरण प्रफुल्लीत केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व बेलपत्रे वाहून ओम नमःशिवाय मंत्राच्या गजरात शिवपिंडीचे पूजन करुन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
यावेळी संघाचे सचिव प्रमोद महाडिक यांच्या आई कै. लक्ष्मीबाई ग. महाडिक व महाराष्ट्राचे जागतीक कबड्डीपटू कै. केसरीनाथ बा. पवार यांचे दुःखद निधन झाले. याबाबत त्यांचे तसेच समाजातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रविण रहाटे यांनी प्रस्तावनेत संस्थेची माहिती दिली. तसेच संस्था ही शंभरी पार करुन एकशे एक वर्षात पदार्पण केले आहे, हे सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावी, पदवी व पदवीका उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित बक्षीस देऊन गौरविण्यात आले. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
जयवंत रसाळ यांनी सांगितले की, घोणसरे येथील गणेश रहाटे यांनी आपली जागा संघाला दिलेली आहे. कमलाकर शेलार यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत कशी मिळेल याचे मार्गदर्शन केले. अनंत रसाळ यांनी समाज संघटीत असेल तर समाजोपयोगी चांगले कार्य करता येतात. एकजुट राहूया. सरपंच अतुल लांजेकर यांनी जात लपवू नका, आपण तेली असल्याचे अभिमानाने सांगा. आपण सर्व व्यवसायीक आहोत. तेलाचे व्यापारी आहोत. तसेच चिपळुण व गुहागर तालुक्यात संघाला सहकार्य लागेल ते मी नक्कीच करेन असे सांगितले. कमलाकर महाडिक यांनी व्यवसायाबाबत माहीती दिली व तरुणांना व्यवसायात यायचे आवाहन केले. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
तसेच संघाचे माजी अध्यक्ष कै. शंकर रहाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि ज्येष्ठकिर्तन वै.ह.भ.प.भिकाजी बाबा महाराज झगडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सर्व गटातील दहावी ते पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमात रोहीणी चव्हाण, निशा झगडे, मानसी महाडिक, कांचन झगडे, देविका रहाटे, स्मिता रसाळ, मयुरी राऊत, ऐश्वर्या रसाळ यांनी उपस्थित महीला भगिनींना हळदीकुंकू व वाण देऊन सन्मानित करत समारंभ साजरा करण्यात आला. नितीन सखाराम लांजेकर यांनी कार्यक्रमाला मुंबई, ठाणे, नवी मुंबई व कोकण विभागातून आलेले संस्थेचे मान्यवर व पदाधिकारी यांचे स्वागत केले. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
यावेळी रोहीणी महाडिक, सर्वश्री दिलीप केळंबेकर, प्रफुल्ल खानविलकर, गणेश महाडिक, सुनिल झगडे, संदीप तेली, श्री राजेंद्र रहाटे, संजय राऊत, संतोष रसाळ, किशोर घोरपडे, मधुकर रसाळ, संजय महाडिक, शांताराम दळवी, दिलिप खोंड, प्रकाश महाडिक, लहु सकपाळ, प्रकाश डीचलोकर, वैभव झगडे, विश्वनाथ रहाटे, संतोष सावडावकर, रविंद्र लांजेकर, अजित कोडेकर, सुरेश रसाळ, गजानन महाडिक व समाज बंधू -भगींनी व माता आवर्जून उपस्थित होते. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सदानंद झगडे यांनी सहज व सुंदर रित्या सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वाटप व्यवस्था गणेश रहाटे, रविंद्र चव्हाण, महेश राऊत, नरेंद्र झगडे, प्रविण रहाटे, उमेश महाडिक, प्रकाश झगडे, नितीन लांजेकर यांनी पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्षा कविता रहाटे, कार्याध्यक्ष जयवंत रसाळ, सह कार्याध्यक्ष नरेंद्र झगडे, उपाध्यक्ष प्रविण रहाटे, नितिन लांजेकर, सह सचिव गणेश रहाटे, खजिनदार प्रकाश झगडे, हिशोब तपासणीस रविंद्र चव्हाण व उमेश महाडिक, महोत्सव कार्यप्रमुख सदानंद झगडे, महेश राऊत, कमलाकर रहाटे, सल्लागार कमलाकर महाडिक यांनी मेहनत घेतली. Friendly meeting by Teli Samojonnati Sangh

