माजी सरपंच यशवंत बाईत यांनी केली चौकशीची मागणी
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलकडून मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी जलजीवन मिशनमधून घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचा अहवालच बोगस आहे. यातून जनतेची फसवणूक केली जात असून, या योजनेचे पाणी कोठे मुरतेय, असा सवाल करत याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच यशवंत बाईत यांनी केली आहे. Anjanvel Water Supply Scheme Report Bogus

बाईत यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, अंजनवेल ग्रामपंचायतीवर प्रशासक असताना ३० नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामसभेतून मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी जलजीवन मिशन मधून पाणी पुरवठा योजना घेण्याचे ठरले. परंतु ग्रामसभेतील ठरावानंतर प्रत्यक्षात इतिवृत्तांत ठराव लिहिताना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी एकत्रितपणे आणि संदिग्ध ठराव लिहिला. १५ डिसेंबर २०२१ रोजी ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्या सहीने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे या योजनेच्या मागणीचा ठराव पाठवण्यात आला. त्यानंतर १० जानेवारी २०२२ रोजी आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेतून पूर्वीच्या इतीवृत्तांतामधील झालेली चूक दाखवण्यात आली आणि मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेलसाठी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना मिळण्याबाबतचे दुसरे पत्र ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला पाठविण्यात आले.
मात्र, या दोन्ही ग्रामसभेतील केलेले ठराव पाहता अंजनवेलवरील प्रशासकीय राजवटीत गावातील प्रमुख ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामस्थांच्या हिताच्या विषयात निर्णय घेण्याऐवजी काही ठराविक लोकांच्या समाधानासाठी निर्णय घेतले असल्याचे पुढे येत आहे. मौजे अंजनवेल व पेठ अंजनवेल अशा दोन पाणी योजना घेण्याचे जलजीवन मिशनमधून दाखवण्यात आले. परंतु त्या एकाच जागी घेण्याचे दाखवले आहे. या योजनेमध्ये पेठ योजनेसाठी स्वतंत्र पाणी योजना करताना विहीर व साठवण टाकीसाठी जागा कोणती हे ठरवलेले अथवा कोणतेही संमत्तीपत्र घेतलेले नाही. पेठ अंजनवेलसाठी लाभार्थ्यांची १० टक्के लोकवर्गणी भरण्याची तयारी असल्याचे कोणतेही संमत्तीपत्र घेतलेले नाही. त्यावेळच्या ग्रामसभेत अत्यंत कमी लाभार्थी उपस्थित होते. Anjanvel Water Supply Scheme Report Bogus
मौजे अंजनवेलसाठी पाणी पुरवठा करणारी विहीर १२ महिने पाणी पुरवठा करत नाही. तरीसुद्धा अंजनवेलसाठी स्वतंत्र नवीन विहीर न घेता जुन्याच विहिरीवर जलजीवन मिशन चालवले आहे. १५ जानेवारी रोजी या योजनेसाठी करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणावेळी माहिती देण्यासाठी प्रशासक स्वप्नील कांबळे, ग्रामविकास अधिकारी विलास बैकर, कर्मचारी रूपेश कडव, ग्रामस्थ शरद यादव, बाळकृष्ण सुर्वे भू वैज्ञानिकांबरोबर होते. Anjanvel Water Supply Scheme Report Bogus
भूजल सर्वेक्षणाचा बोगस अहवाल भू वैज्ञानिक शिवाजी कळेकर यांनी पेठ अंजनवेलसाठी ब्राह्मणवाडी विहिरीतून हिवाळ्यात ७० हजार, तर उन्हाळ्यात ३९ हजार लिटर पाणी दिवसाला पुरवठा केला जातो असा अहवाल दिला आहे. विहिरीची खोली १० मिटर व व्यवस ६.३० मिटर दिला आहे. पाण्याची पातळी हिवाळ्यात ५.१० व उन्हाळ्यात ८ मीटर दिली आहे, तर पेठ अंजनवेलसाठी लोकसंख्येप्रमाणे दिवसाला ६९७९५ लिटर पाणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच दुसऱ्या मौजे अंजनवेलसाठीच्या योजनेकरिता ब्राह्मणवाडी विहिरीतून हिवाळ्यात १ लाख ४४ हजार लिटर, तर उन्हाळ्यात १ लाख २५ हजार लिटर दिवसाला पाणी पुरवठा होतो असे दिले आहे. यावेळी त्या एकाच विहिरीची खोली ११ मिटर, व्यास ७.१० मीटर दिला असून मौजे अंजनवेलच्या लोकसंख्येप्रमाणे दिवसाला १ लाख १७ हजार ६४५ लिटर पाणी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. Anjanvel Water Supply Scheme Report Bogus
मात्र दिलेल्या अहवालामध्ये ब्राह्मणवाडीमध्ये एकच विहीर असून दुसरी बोगस विहीर कागदोपत्री दाखवून त्याची क्षमता व व्यास, खोली याची वेगवेगळी खोटी व फसवी माहिती देऊन खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप बाईत यांनी केला आहे. पेठ अंजनवेलसाठी विहिरीची जागा, साठवण टाकी जागा कोणती, त्या जागेचे बक्षीसपत्र नाही. पेठ अंजनवेलसाठी फक्त ३०७९५ लिटर दिवसाला पाणी आवश्यक असून मौजी अंजवेलसाठी पाण्याची आवश्यकता नाही, असेही अहवालामध्ये म्हटल्याचे त्यांनी नमुद केले आहे. Anjanvel Water Supply Scheme Report Bogus

