गुहागर, ता. 22 : पोलीस परेड मैदानावर येथील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याडेश्वर महोत्सवाला गुहागरवासीयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चमचमीत खाद्यपदार्थांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खास खेळण्यांचे आकर्षण, विनोदी आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे सूत्रसंचालन यामुळे या महोत्सवात आणखीनच रंगत आणली. Crowd of spectators at Vyadeshwar festival

दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य व शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात क्रियाशीलपणे काम करणाऱ्या श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची कार्यक्रमाचे केले जाते. तसेच स्थानिक व पर्यटकांच्या करमणुकीसाठी व्याडेश्वर महोत्सवाचेहि आयोजन केले जाते. गेले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे हा महोत्सव होऊ शकला नव्हता. मधल्या काळात तालुक्यातही असा मोठा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. यावर्षी देवस्थाने व्याडेश्वर महोत्सवाचे आयोजन करून तमाम स्थानिक कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. Crowd of spectators at Vyadeshwar festival

या महोत्सवाचे नगराध्यक्ष राजेश यांच्या हस्ते झाले. यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते दादा इदाते उपस्थित होते. स्थानिक कलाकारांना काय महोत्सवात विविधांगी नृत्य सादर करण्याची संधी देवस्थानने उपलब्ध करून दिली आहे. देवस्थानने आपल्या धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यातही देवस्थानचा मोठा वाटा आहे. महोत्सवात रेकॉर्ड डान्स, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, दांडीया, आर्केस्ट्रा, मंगळागौर, जादुचे प्रयोग, नमन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वांसाठी विविध करमणूकीचे कार्यक्रम, विविध शाकाहारी पदार्थाचे स्टॉल, विविध वस्तूचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. Crowd of spectators at Vyadeshwar festival

तसेच गुहागर शहरातील देवस्थाने यांचा देखील यानिमित्ताने गौरव करण्यात आला. विठ्ठल रखुमाई मंदिर शिवाजी चौक सत्यवान घाडे, गुहागर आगार दत्त मंदिराचे संदीप वैद्य, हनुमान मंदिर धनंजय खातू, गणेश देवस्थानचे संजय सावरकर, असगोली ग्रामदेवता व्याघ्रांबरी देवस्थानचे गजानन धावडे, वालुकेश्वर मंदिरचे प्रकाश कनगुटकर, उरफाटा गणपती मंदिरचे मंदार आठवले, संताजी जगनाडे महाराज अरुण रहाटे, बाजी चंडिका मानाई मंदिरचे राजेंद्र भागडे, दुर्गादेवी मंदिरचे किरण खरे, रवळनाथ मंदिर वरचापाट नितीन सांगळे, अष्टविने गणेश मंदिरचे जयंत गोणबरे, श्री कोपरी नारायण मंदिरचे समीर घाणेकर, ब्रम्हाचैतन्य उपासना केंद्र अरुण परचुरे, ब्रम्हकुमारी उपासना केंद्र आदींचा गौरव करण्यात आला. Crowd of spectators at Vyadeshwar festival

अलाक्यू स्टॅच्यू स्टॅचू ग्रुप ऑफ बांदा यांच्यावतीने गेले तीन दिवस स्टॅच्यू राहून प्रक्षकांची मने जिंकली. आज बुधवार 22 फेब्रुवारी रोजी तिसऱ्या दिवशी संस्कृती ग्रुप चिपळूण यांचा देवीचा जागर व मंगलागौर, विकट धावडे याने केडीसी ग्रुप तर्फे शिवराज्याभिषेक, बासरी, हार्मोनियम ढोलकी व तबला वादन यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम, केडीसी ग्रुपचे शेतकरी नृत्य, मळण येथील महेश साळवी यांचा आखाडा, आभार प्रदर्शन, मळण येथील अर्जुन आग्रे यांचे पालखी नृत्य, व असगोली यांचा नमनाच्या कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता होणार आहे. Crowd of spectators at Vyadeshwar festival

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देव व्याडेश्र्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे, खजिनदार सर्वेश भावे, सचिव प्रथमेश दामले, विश्वस्त प्रकाश भावे, संदीप बारटक्के, सिध्दीविनायक जाधव, मयुरेश आठवले, श्रीधर आठवले, गजानन मोरे, अभिजीत भिडे, हेमंत बारटक्के, सचिन मुसळे, मनीष कामेरकर, केदार खरे यांचे योगदान लाभले. तसेच या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी सूत्रसंचालक जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, दीपक देवकर, प्रा. मनाली बावधनकर, निलेश गोयथळे, कृपाल परचुरे यांनी पुढाकार घेतला. Crowd of spectators at Vyadeshwar festival
