• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या सहा नगरसेविका सामंत बंधुंना भेटल्या

by Mayuresh Patnakar
February 22, 2023
in Guhagar
246 2
1
The corporators of Guhagar met Samant brothers
482
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण

गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायतीमधील सहा नगरसेविकांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि भैय्या सामंत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर देखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचे नेमके कारण काय याची चर्चा सध्या सुरु आहे. The corporators of Guhagar met Samant brothers

गुहागर नगरपंचायतीमधील बांधकाम सभापती सौ. वैशाली मालप, सौ. स्नेहा सांगळे, सौ. मनाली सांगळे या तीन शहर  विकास आघाडीच्या नगरसेविका, भाजपच्या सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, सौ. मृणाल गोयथळे आणि नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. स्नेहा भागडे यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारीला) शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्या समवेत रत्नागिरीत गेल्या होत्या. तेथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर शिर्के हायस्कुलजवळील सामंत कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात जावून या भैय्या सामंत याचीही भेट घेतली. The corporators of Guhagar met Samant brothers

The corporators of Guhagar met Samant brothers

या भेटीबाबत विचारणा केली असता पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागर नगरपंचायतीला 2 कोटींचा निधी त्यामुळे धन्यवाद देण्यासाठी मंत्री सामंत यांची भेट घेतली.  विकास निधी मागायला गेलो होतो. सदिच्छा भेट होती. अशी विविध कारणे सांगण्यात आली. मात्र भैय्या सामंत यांच्या भेटीबाबत काहीशी गुप्तताच बाळगण्यात आली होती. The corporators of Guhagar met Samant brothers

गुहागर नगरपंचायतीचा कार्यकाल संपण्यासाठी अवघे दोन महीने आहेत. अशावेळी गुहागरच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुहागर शहराचा पुढील दोन महिन्यात झपाट्याने विकास होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. The corporators of Guhagar met Samant brothers

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाची उपस्थिती आणि भैय्या सामंत यांच्या भेटीमुळे शहर विकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेविकांना शिवसेनेत घेण्यासाठी हा दौरा असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील अनेक मंडळी भेटतात पण गेल्या काही महिन्यात भैया सामंत याची भेट म्हणजे शिंदे गटात प्रवेश अशी ओळख झाली आहे.  शिवसेनेचे (शिंदे गट) गुहागर शहरातील बळ वाढविण्यासाठी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे. The corporators of Guhagar met Samant brothers

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe corporators of Guhagar met Samant brothersUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share193SendTweet121
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.