द्वितीय क्रमांक पद्मश्री वैद्य
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त गुहागर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अजिंक्य प्रमोद नेटके तर द्वितीय क्रमांक पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिने प्राप्त केला. तृतीय क्रमांक शुभम संतोष येद्रे, चतुर्थ क्रमांक दत्तात्रय काशिनाथ राठोड व कल्याणी प्रसाद नेटके यांना विभागून देण्यात आला. Ajinkya first in the Aabaloli Chess Tournament

श्री छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ. साळवी म्हणाले, शिवजयंती निमित्त अशा विविध स्पर्धा नेहमी घेतल्या गेल्या पाहिजेत. अशा स्पर्धांमधून गुणवान खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल, यापूर्वीही मी अशा स्पर्धांच्या आयोजनाला पाठिंबा देत होतो. परंतु कोव्हिड काळापासून या स्पर्धा थांबल्या होत्या, असे ते म्हणाले. Ajinkya first in the Aabaloli Chess Tournament

यानंतर या स्पर्धेच्या आर्बिटर सौ. नमिता वैद्य यांनी स्पर्धेची नियमावली सांगितली. श्री. वैद्य यांनी लॉट्स पाडून स्पर्धेची सुरुवात करून घेतली. या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला हा एकच वयोगट होता. यामध्ये पहिले पाच क्रमांक काढले गेले. त्यांना प्रमाणपत्र, पुस्तके व ट्रॉफी अशा प्रकारची बक्षिसे दिली गेली. Ajinkya first in the Aabaloli Chess Tournament

या स्पर्धेच्या यशासाठी श्री. प्रसन्ना वैदय, विजय पागडे, वाचनालय ग्रंथपाल सिद्धी पाटील यांनी महत्वपूर्ण काम पार पाडले. आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. साळवी यांनी सदर स्पर्धेची सर्व बक्षिसे पुरस्कृत केली होती. यावेळी श्री. मेस्त्री, श्री. सुहास बागकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. Ajinkya first in the Aabaloli Chess Tournament
