रत्नागिरी ता. 20 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी ) ची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) ची परीक्षा 02 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली आहे. Prohibitory order for 12th and 10th exams

परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परीसरात अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हयातील परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी 21 फेब्रुवारी 2023 ते 25 मार्च 2023 रोजीपर्यंत सकाळी 09.00 वाजल्यापासून सायंकाळी 07.00 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. Prohibitory order for 12th and 10th exams
त्यानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपण इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. Prohibitory order for 12th and 10th exams
सदर आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांचे बाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यना करील तो भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. Prohibitory order for 12th and 10th exams

