• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पर्यटन मंत्री लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

by Manoj Bavdhankar
February 20, 2023
in Bharat
80 1
0
Lodha inaugurated the Hinduvi Swarajya Mahotsav
158
SHARES
451
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत धरला फेर

पुणे, दि. 20 : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी शिवकालीन बाजारपेठेतून टोपली खरेदी केली. तसेच तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत स्वत: फेर धरत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. Lodha inaugurated the Hinduvi Swarajya Mahotsav

पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी सुरुवातीला जुन्नरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ‘शिवजन्मभूमी जुन्नर’ या सेल्फी पॉईंटचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर  शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चेही उद्घाटन करण्यात आले. यामध्ये तत्कालीन गवताची घरे, लोहारकाम, कैकाडी, कुंभारकाम आदी व्यवसाय, आदिवासी तरपा नृत्य, वासुदेव, गोंधळी परंपरा, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या गावामध्ये बनविण्यात आलेली शिवकालीन बाजारपेठ आकर्षण उपस्थितांचे आकर्षण बनून राहिली. यामध्ये मंत्री लोढा यांनी बांबूची टोपली खरेदी केली. यावेळी तसेच  http://www.hindaviswarajya.info/  या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी आदिवासी तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत फेर धरला. यानंतर मंत्री श्री.लोढा यांनी शरद बुट्टे पाटील क्रीडांगण येथे बचत गट प्रदर्शन, महाशिवआरती कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी भेट दिली. Lodha inaugurated the Hinduvi Swarajya Mahotsav

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी सारंग कोडेलकर, पर्यटन सहसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आदी उपस्थित होते. Lodha inaugurated the Hinduvi Swarajya Mahotsav

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLodha inaugurated the Hinduvi Swarajya MahotsavMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet40
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.