• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ येथील विजय गडावर शिवजयंती साजरी

by Manoj Bavdhankar
February 20, 2023
in Guhagar
91 0
0
Shiv Jayanti celebrated at Tavasal
178
SHARES
508
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 20 : तालुक्याच्या उत्तर किनारपट्टीवर, अरबी समुद्राच्या मुखावरती अति प्राचीन काळी उभारलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला. विजय गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये स्वरांगी गंधेरे आणि अस्मिता गंधेरे यांनी परिधान केलेली ऐतिहासिक वेशभूषा सर्व उपस्थीतीतांचे लक्ष वेधून घेणारी होती. Shiv Jayanti celebrated at Tavasal

या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आणि भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या विशेष सहकार्याने गडाची साफसफाई करण्यात आली होती. या शुभदिनी जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर १ मधील सर्व विद्यार्थीआणि शिक्षक वृंद यांनी शाळेमध्ये शिवजयंती साजरी केल्यानंतर विजय गडाकडे सर्व ग्रामस्थ बंधु भगिनींसह कुच केली. गडाच्या अग्रणी बुरुजावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तवसाळ ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप सुर्वे, सरपंच प्रसाद सुर्वे, मंगेश गडदे, मुख्याध्यापक खंडगावकर, सहशिक्षक राठोड, विजय शिवलकर, अशोक पड्याळ या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणांनी विजय गडाचा परिसर दुमदुमून गेला होता. यानंतर जिल्हा परिषद आदर्श शाळा तवसाळ नंबर 1 मधील विद्यार्थ्यांनी छत्रपतींबद्दल मनोगत, माहिती सर्वांसमोर अतिशय मोजक्या शब्दात मांडली. Shiv Jayanti celebrated at Tavasal

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

यावेळी पडवे येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि शिवप्रेमी विनायक कोळवणकर, काताळे ग्रामपंचायत सदस्य विनायक बारस्कर, दीपक बारस्कर, ग्राम विस्तार अधिकारी महेंद्र निमकर, तवसाळ बौद्धवाडी मधील जेष्ठ ग्रामस्थ रवींद्र पवार, विलास सुर्वे, प्रशांत सुर्वे, पंकज सुर्वे, राजेश सुर्वे, उदय शिलधनकर, कीरण गडदे, जगदिश गडदे, विदुल जाधव, विज्ञान सुर्वे, प्रीतम सुर्वे, महेश सुर्वे, अमोल सुर्वे, मनोज कांबळे, रत्नदीप गडदे, तेजस शिवलकर, शुभम सुर्वे, प्रणय सुर्वे, पुष्पराज सुर्वे, संकेत गंधेरे, सौ. सानवी सुर्वे, सौ.तन्वी गंधेरे, पोस्ट कर्मचारी देशमुखे आदी बहुसंख्य ग्रामस्थांसहित  हेदवी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची  उपस्थिती लक्षणीय होती. Shiv Jayanti celebrated at Tavasal

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShiv Jayanti celebrated at TavasalUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet45
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.