• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा प्रशासन इ. दहावी व बारावी परीक्षेसाठी सज्ज

by Manoj Bavdhankar
February 18, 2023
in Bharat
110 1
0
Prohibitory order for 12th and 10th exams
216
SHARES
617
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हयात 16 भरारी पथके

रत्नागिरी दि.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.  गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकानिहाय भरारी पथके तयार केली आहेत. या परीक्षांच्या भयमुक्त व कॉपीमुक्त आयोजनाबाबत राज्य मंडळाने शिक्षासूची जाहीर केली आहे. District administration is ready for 10th and 12th exams

जिल्ह्यामध्ये भयमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात  जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह,  जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,  मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.रत्नागिरी किर्तीकिरण पुजार,  शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे या वर्षांच्या परीक्षार्थींना निकोप वातावरणामध्ये परीक्षा देण्यास मदत होणार आहे. तसेच कॉपी बहाद्दुरांवर भरारी पथकांची करडी नजर असणार आहे. District administration is ready for 10th and 12th exams 

फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची जिल्हा प्रशासनाने पुर्ण तयारी केली आहे. या परिक्षेमध्ये व्यक्तिगत व सामुहिक गैरमार्गाच्या प्रकरणांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने तालुकास्तरावर पथके नियुक्त केली आहेत. यामध्ये प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र भरारी पथक निर्माण करण्यात आली आहेत. या भरारी पथकांना परीक्षा कालावधीमध्ये जास्तीत जास्त परीक्षा केंद्रांना भेट देऊन परीक्षा संचलनाची पहाणी करण्याचा व गैरमार्गांना आळा घालण्याचा आदेश देण्यात  आला आहे. District administration is ready for 10th and 12th exams

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित केली असून, जिल्ह्यात बारावी परीक्षेसाठी एकूण केंद्र ३८ तसेच परिरक्षक कार्यालय  १२ असून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १७ हजार ३७९ आहे.  तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीच्या लेखी परीक्षा ०२ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित केली असून, इयत्ता दहावी परीक्षेसाठी एकूण केंद्र ७३ तसेच परिरक्षक मंडळ १३ असून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार १९९ इतकी आहे. या परीक्षांसंदर्भात कोकण विभागीय मंडळ यांच्या स्तरावर केंद्रसंचालक, मुख्याध्यापक व परिरक्षक यांच्या सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. रत्नागिरी यांनी कळविले आहे. District administration is ready for 10th and 12th exams

Tags: District administration is ready for 10th and 12th examsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.