गुहागर, ता. 17 : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने भंडारी समाजातील विवाहास इच्छुक वधू – वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर शहरातील कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन येथे इच्छुक वधू – वरांनी स. 10 ते दु. 4 या वेळेत उपस्थित रहावे. Bride-to-groom suggestive meeting

गुहागर तालुक्यातील, रत्नागिरी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भंडारी समाजातील मुला – मुलींनी यात सहभागी व्हावे. यावेळी स. 10 ते 12 या वेळेत वधुवरांची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर दु.1 ते 4 पर्यंत नोंदणीकृत वधुवरांची प्रत्यक्षात ओळख व परिचय करून देण्यात येईल. येताना नोंदणीसाठी वधुवरांनी जन्मपत्रीकेची झेरॉक्स, उभा फोटो व बायोडाटा आणावा. Bride-to-groom suggestive meeting
अधिक माहितीसाठी- गजानन मोरे 9423294196, अनिल किर 9422628576 / 9421188224 यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे, सचिव निलेश मोरे यांनी केले आहे. Bride-to-groom suggestive meeting

