गुहागर नगरपंचायत महाविकास आघाडी म्हणून लढणार – आ. भास्कर जाधव
गुहागर, ता. 17 : शहराच्या विकासासाठी मी सदैव पुढे असून नगरपंचायतीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यावेळी महाविकास आघाडी म्हणून लढणार असून यासाठी येथील राष्ट्रवादीला बरोबर घेऊनच शहराचा विकास केला जाईल, असे सांगताच शहरात शिवसेनेची ताकद तयार झाली. ज्यांनी आपली साथ सोडली त्यांच्याबाबत बोलण्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेल्या या शिवसेनेचे नेतृत्व असलेले उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन जे आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन शहरात शिवसेना अधिक बळकट करूया, असे आवाहन आ. भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना केले. Jadhav appointed as Guhagar city chief

आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर शहरातील शिवसेना पक्ष कार्यालयात शहर प्रमुख म्हणून सिद्धीविनायक जाधव यांची नियुक्ती केली. तसेच युवा सेना गुहागर तालुका प्रमुख पदी इम्रान रफिक घारे, युवासेना शहरप्रमुख राज विखारे, उपशहर अधिकारी केदार वराडकर, सोहम सातार्डेकर, युवा सेना विभागप्रमुख विनोद कदम, ऋषिकेश जाधव, युवासेना सेचिव शुभम तवसाळकर, किरण पावसकर, सुरज रहाटे, प्रसाद गुरव यांची निवड जाहीर केले. Jadhav appointed as Guhagar city chief
यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते आ. जाधव यांनी म्हणाले की, जे उद्धव साहेबांच्या विचाराने आपल्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन कामाला लागा. प्रत्येक व्यक्ती जोडा, कुठेही लाचारी नको. ज्यांना संधी देऊनही गेल्या पाच वर्षात शहरात काहीही मोठा बदल झालेला नाही असे वाटत असेल त्यांनी बिंधास पुढे यावे. नक्कीच या शहराचा विकास अधिक गतीने आपण करू शकतो. कोणतीही निवडणूक आली की पहीले लोकप्रतिनिधी कोणताही निधी त्या नगरपंचायतीमध्ये ठेवत नाही. परंतु आपण सीडीपी करून तब्बल १८ कोटीचा निधी व आवश्यक आराखडाही समोर ठेवला होता. पाणी योजना, स्वच्छतेसाठी आवश्यकत ती रक्कमेची तरतुद आपण केली होती. यामुळे येणाऱ्या नव्या बॉडीला केवळ समोर शिजवून ठेवलेले योग्य पद्धतीने विनियोग करायचा होता. तोही करता आलेला नसल्याचे जनता बोलत आहे. यामुळे तुम्हाला विकास हवा असेल तर मी नक्कीच तुमच्याबरोबर आहे. येथील जनतेने बदल स्विकारला, मग त्यांच्या विकासकामांमध्ये आपण कोणताही अडथळा अथवा हस्तक्षेप केला नाही. परंतु या शहराच्या विकासासाठी मी सदैव पुढे असेन, असे जाधव म्हणाले. Jadhav appointed as Guhagar city chief
ते पुढे म्हणाले, आपल्याबरोबर असलेले दुसऱ्या शिवसेनेमध्ये गेले. त्यांच्याबाबत मी काहीही बोलत नाही. परंतु त्यांचे माझ्याबाबत काय मत आहे हे मला आता कळते आहे. यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीला आपल्याकडून शुभेच्छा. गेल्या पाच वर्षात असगोली नगरपंचायतीमधुन गेली. जेटी व सी व्ह्यु गॅलरी तोडल्या गेल्या, नाना- नानी पार्क, उद्यान गेले. मग नवीन कोणते काम झाले ते जनतेने सांगणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. Jadhav appointed as Guhagar city chief