गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात शनिवार दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी हे कार्यक्रम पार पडतील. यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. Festival at Patpanhale Sri Shivdev Belvriksha Temple

यानिमित्ताने दि. १८ रोजी सकाळी ७ वा. अभिषेक, दुपारी ११ वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी ३ वा. महिलांचा हळदीकुंकू, संध्या. ४ वा. इतर स्पर्धा, संध्या ६ वा. महाआरती, रात्री ९ वा. सत्कार समारंभ, संध्या ७ ते ९ शिवभंडारा, रात्री १० वा. श्री संत गोरोबा काका प्रासादिक नमन मंडळ, देवरुख (खालची कुंभारवाडी) यांचे बहुरंगी नमन ‘हर हर महादेव’ असे कार्यक्रम पार पडणार आहेत. Festival at Patpanhale Sri Shivdev Belvriksha Temple
तरी भाविकांनी दर्शनाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवदेव बेलवृक्ष उत्कर्ष मंडळ व महिला मंडळ पाटपन्हाळे गावडेवाडी तर्फे करण्यात आले आहे. Festival at Patpanhale Sri Shivdev Belvriksha Temple

