गुहागर, ता. 16 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर शहरातील महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहरातील महिलांनी गुहागर पोलिसांचा गौरव केला. Women glorified Guhagar Police

गरज फाउंडेशन या नावाने जळगाव येथील संदीप शरद मुळे याने व्हाट्सअप ग्रुप तयार केला व जिल्ह्यातील महिलांच्या संपर्कात राहून सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर घरबसल्या बनवून महिलांना रोजगार संधी मिळवून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे शहरातील महिलांची तालुका पातळीवर कमिटी नेमण्यास सांगितली. या कमिटीच्या माध्यमातून तेथील महिलांचे सभासद फी व इतर रोख रक्कम स्वतःच्या जळगाव येथील बँक खात्यात टाकण्यास सांगितले. सुरुवातीचे काही महिने लवकरच कच्चामाल पाठवून देतो असे सांगितले. परंतु, त्यानंतर मुळे याने चालढकल सुरू केली. ज्या महिलांनी पुढाकार घेऊन महिलांकडून पैसे घेतले होते. अशा महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. अखेर शहरातील महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सतर्कता दाखवत या भामट्याला ताब्यात घेतले. Women glorified Guhagar Police
भामट्याने न्यायालयात या महिलांचे पैसे पुढील एका महिन्यात देणार असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल शहरातील महिलांनी गुहागर पोलीस स्थानकात जाऊन पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, उप निरीक्षक पवनकुमार कांबळे यांचा मानसी शेटे, मुग्धा मोरे, प्रिती वराडकर यांनी अभिनंदन केले. Women glorified Guhagar Police

