दि. 19 रोजी अमित पोफळे लिखित व दिग्दर्शीत “कन्यादान” नाट्यकलाकृती
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 17 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा केला जाणार आहे. स्वयंभू श्री सोमनागेश्वर देवस्थान जागृत देवस्थान असून विविध ठिकाणाहून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी उत्सव साजरा केला जातो. Mahashivratri festival at Talvali

महाशिवरात्र महोत्सवनिमित्त शुक्रवार दिनांक 17 रोजी मंत्रोक्त पूजा, अभिषेक, दुपारी 12 वा.आरती, सायंकाळी 6 ते 8 हरिपाठ, आरती त्यानंतर छबिना व सुस्वर भजने, शनिवार दिनांक 18 रोजी मंत्रोक्त पूजा, अभिषेक, सायंकाळी 4 ते 5 शिवलीलामृत वाचन, सायं.7 ते 9 सुश्राव्य कीर्तन, त्यानंतर आरती, छबिना व रात्री 10 वाजता झटपट लॉटरी सोडत तर रविवार दिनांक 19 रोजी मंत्रोक्त पूजा, अभिषेक, दुपारी 12.30 ते 2 महाप्रसाद, रात्रौ 8 ते 9 आरती, छबिना व रात्रौ ठीक 10 वाजता अमित पोफळे लिखित व दिग्दर्शीत “कन्यादान” ही दोन अंकी नाट्यकलाकृती सादर केली जाणार आहे. Mahashivratri festival at Talvali
तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वयंभू श्री सोमनागेश्वर देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. Mahashivratri festival at Talvali

