• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती!

by Guhagar News
February 15, 2023
in Bharat
114 1
0
Shraddha Walavakar Incident Revisited
223
SHARES
637
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिल्लीत गर्लफ्रेंडचा खून करुन मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये

गुहागर, ता.15 : दिल्लीमध्ये पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खूनानंतर तरुणाने दुसऱ्या तरुणीसह लग्नही केलं. प्रेयसीने लग्नाला विरोध केल्याने हा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. Shraddha Walavakar Incident Revisited

निक्की यादव असे मृत तरुणीचे नाव आहे. तर, साहिल गेहलोत ( वय 23 ) असं तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी तरुण साहिल गेहलोतला अटक केली आहे. साहिल हा मित्राव गावाचा रहिवाशी होता. तर, निक्की हरयाणातील झज्जर येथील रहिवाशी होती. ‍साहिल आणि निक्कीची पहिल्यांदा ओळख स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना झाली होती. त्यानंतर साहिल आणि निक्की हे दिल्लीतील द्वारका परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होते. साहिलने आपल्या प्रेमासंबंधी कुटुंबियांनी माहिती दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी साहिलचे दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न जमवलं होतं. ‍ही माहिती निक्कीला मिळाल्यानंतर तिने साहिलला काश्मीरी गेटजवळ भेटण्यासाठी बोलवलं. तेव्हा चर्चेवेळी दोघांत जोरदार वाद झाला. या वादातूनच साहिलने आपल्या कार मधील मोबाईल फोनच्या केबलच्या मदतीने निक्कीचा गळा आवळून खून केला. Shraddha Walavakar Incident Revisited

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

खून केल्यानंतर साहिलने तिचा मृतदेह मित्राव गावाच्या परिसरात असलेल्या एका ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला. 9 आणि 10 च्या मध्यरात्री खून केल्यानंतर साहिल्याने 10 फेब्रुवारीला दुसऱ्या तरुणीसह लग्न केलं. ही धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी साहिलला अटक केली आहे. Shraddha Walavakar Incident Revisited

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShraddha Walavakar Incident RevisitedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share89SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.