शार्दुल भावे : अंबालातील कारागीराची कलाकृती
गुहागर, ता.15 : व्याडेश्वर देवस्थानने 10 फुट उंचीचा 70 किलो वजनाचा स्टिलचा त्रिशूळ व डमरू आणला आहे. असा भव्य त्रिशुळ आजतरी तालुक्यात नाही. त्यामुळे हा त्रिशुळ भाविकांबरोबरच पर्यटकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरेल. असा विश्वास व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे यांनी व्यक्त केला. Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple

महाशिवरात्री उत्सवाची माहिती देण्यासाठी व्याडेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी शार्दुल भावे म्हणाले की, देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक दायित्व निभावले जाते. कोरोना महामारीत मोफत मास्क वाटप, होमिओपॅथीच्या गोळ्यांचे वाटप, निर्जंतुकीकरण आदी निरनिराळ्या प्रकारात स्थानिक प्रशासन, आरोग्य खाते यांना मदत केली. शहरात देवस्थानने मोफत मास्क वाटप केले. तालुक्यातील देवस्थानांना मदत केली. 2019 मध्ये पर्यटक वाढीसाठी व्याडेश्वर महोत्सव भरवला. याहीवर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple

या उपक्रमांबरोबरच मंदिरात एखादा आकर्षण बिंदू, सेल्फी पाँईंट असावा असा विचार आम्ही करत होतो. त्यावेळी विश्वस्त मनीष कामेरकर यांनी शंकराची ओळख असलेला रुद्राक्षमाळा व डमरू अलंकृत भव्य त्रिशुळ स्थापन करण्याची कल्पना मांडली. सर्वांनीच कल्पना उचलून धरली. कामेरकर यांनी विविध माध्यमातून कारागीराचा शोध सुरू केला. त्यावेळी हरियाणातील अंबाला येथे सर्व प्रकारच्या धातुंपासून विविध वस्तू बनविणारा एक सामान्य कुटुंबातील उत्तम कारागीराचा पत्ता मिळाला. त्याच्याशी संपर्क साधला त्यावेळी देशातील अनेक मंदिरात त्यांनी बनविलेल्या कलाकृती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या कारागिराकडून त्रिशुळ बनवून घेतला. आम्ही थेट त्याच्याशीच व्यवहार केल्याने एक सामान्य कारागिराला थोडीफार मदत झाली, शिवाय देवस्थानचे पैसेही वाचले. Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple
आज 10 फुट उंचीचा 70 किलो वजनाचा स्टिलचा त्रिशूळ व डमरू व्याडेश्वर मंदिरात नंदी सभागृहात सर्वांना पहाण्यासाठी ठेवण्यात आला आहे. या त्रिशुळाची विधीवत स्थापना करण्यात येणार आहे. तत्पुर्वीच हा त्रिशुळ आकर्षणाचा बिंदू ठरला आहे. अनेक भाविक, पर्यटक या त्रिशुळासोबत सेल्फी काढतात. चौकशी करतात. त्रिशूळ सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. अजूनही त्रिशुळावर रुद्राक्ष माळा ठेवायच्या आहेत. त्रिशुळामागे आकर्षक रंगरंगोटी असलेला पडदा कींवा चित्र रंगविण्यात येणार आहे. त्यामुळे हा त्रिशुळ व्याडेश्वर देवस्थानची तसेच गुहागर तालुक्याची वेगळी ओळख तयार करेल. असा आशावाद शार्दुल भावे यांनी व्यक्त केला. Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple
यावेळी सचिन मुसळे, केदार खरे, मनिष कामरेकर, हेमंत बारटक्के, प्रकाश भावे, संदीप बारटक्के, सिद्धिविनायक जाधव आदी विश्वस्त उपस्थित होते. Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple

